Ayush Prasad: यांनी घेतली बोदवड तालुका प्रशासनाची आढावा बैठक

जळगाव : जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी बोदवड तहसील कार्यालयात बैठक घेतली तालुका प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना अधिकारी – कर्मचाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने काम करावे. कार्यालयात पूर्णवेळ थांबून गतीने काम केल्यास प्रलंबित प्रकरणांचा निपटारा त्वरित होईल, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बोदवड तालुका प्रशासनाच्या आढावा बैठकीत त्यानी दिल्या

जिल्हाधिकारी  म्हणाले, मतदान‌ केंद्राच्या दुरूस्तीबाबत जिल्हा परिषदेमार्फत डीपीडीसीमार्फत प्रस्ताव पाठविण्यात यावेत. बीएलओनी मतदारकार्ड व आधारजोडणी कार्यक्रमाची घरोघरी भेटी देऊन जागृती करावी‌. ई-पीक पाहणीसाठी गावनिहाय बैठका घेण्यात येऊन जनजागृती करण्यात यावी. गावात कोतवाल, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक सर्व यंत्रणांचा वापर करून ई-पीक पाहणीची प्रभावी अंमलबजावणी करावी. महसूल थकबाकी वसूलीची कार्यवाही जलदपणे राबवावी.

सायंकाळी पाचला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नगरपंचायत व तहसील कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली. त्यात त्यांनी शासकीय कामकाजाचा आढावा घेतला तर शहरातील नगरपंचायतमधील स्वच्छ भारत अभियान तसेच घनकचरा प्रकल्पाच्या डम्पिंग ग्राउंडबाबत सुरू असलेला नाडगाव ग्रामपंचायत व नगरपंचायत यांच्यातील वाद समोपचाराने सोडविण्यात यावा, असे आवाहन केले. यावेळी तहसीलदार मयूर कळसे, प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील, मुख्य अधिकारी गजानन तायडे, नगराध्यक्ष आंनदा पाटील व इतर नगरसेवक उपस्थित होते.