---Advertisement---

Baba Siddique: पाच वर्षाचे वैर क्षणात संपलं ; बाबा सिद्दीकी यांनी असे घडवून आणले सलमान-शाहरुखचे मनोमिलन !

by team
---Advertisement---

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते बाबा सिद्धीकी यांच्यावर शनिवारी संध्याकाळी अज्ञातांनी हल्लाकरत गोळ्या झाडल्या. त्यांना लागलीच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र ,  तेथे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने राजकारण क्षेत्रासह बॉलिवूड शोकसागरात बुडाला आहे.  दरम्यान सलमान खान आणि बाबा सिद्दीकी यांची मैत्री सर्वश्रुत आहे. बाबा सिद्धीकी यांच्या मृत्यूची बातमी कळताच सलमान खान याने हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. बाबा सिद्धीकी यांनी सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातील संघर्ष संपविण्यात पुढाकार घेतला होता.

कतरिना कैफची  २००८ साली  वाढदिवसाची पार्टी होती. या पार्टीत शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यात जोरदार वाद उफाळून आला होता. या वादानंतर या दोघांनी एकमेकांशी अबोल घेतला होता. या भांडणानंतर सलमान व शाहरुख दोघे कोणत्याही पार्टीत किंवा कार्यक्रमास एकत्र हजर राहिले नाहीत. यातून त्यांच्यातील दुरावा वाढत गेला.

बाबा सिद्दीकी यांनी शाहरुख आणि सलमानमधील भांडण संपविण्यात मोठी भूमिका बजावली. बाबा सिद्धीकी यांच्या या कृतीमुळे शाहरुख व सलमान पाच वर्षांनी पुन्हा एकत्र येऊन त्यांची मैत्री घट्ट झाली. हे सर्व जुळून आले ते  २०१३  साली बाबा सिद्धीकी यांच्या इफ्तार पार्टीत. बाबा सिद्धीकी यांनी या पार्टीला शाहरुख आणि सलमान या दोघांना आमंत्रित केले. पार्टीमध्ये दोघां सुपर स्टार्स यांनी हजेरी लावली. यावेळी या दोघांनी सर्वांसमोर एकमेकांनी मिठी मारत दोघांमधील समजगैरसमज दूर केलेत. याप्रसंगी बाबा सिद्दिकी यांनी शाहरुख आणि सलमान यांना पापाराझींसमोर एकत्र फोटो घेण्याची विनंती केली होती. अशा प्रकारे बाबा सिद्दीकी यांनी शाहरुख आणि सलमान खान मधील पाच वर्षांपासून सुरु असलेले भांडणं संपवून दोघांमध्ये मैत्रीचे धागे घट्ट केलेत.

बाबा सिद्दीकी यांनी १९७७ पासून आपल्या राजकीय प्रवासास प्रारंभ केला. त्यांनी प्रथम काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राजकारणात त्यांनी चाळीस वर्षाच्या कारकिर्दीत आमदार ते मंत्री पदापर्यंत मजल मारली. यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये 1999, 2004 आणि 2009 मध्ये मंत्रीपपदाचा समावेश आहे.

वांद्रे येथून बाबा सिद्दीकी  तीनवेळा आमदार झाले. या वर्षाच्या प्रारंभाला सिद्दीकी यांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्याच वेळी, त्याचे बॉलिवूड स्टार्स, विशेषतः सलमान खान आणि संजय दत्त यांच्याशी जवळचे संबंध होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment