जळगाव : विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावं, मुलींच्या शिक्षणात चालना मिळावी मुलींच्या शिक्षणाविषयीच्या भावना तिच्या पालकांना, वडिलांना कळाव्यात तिला भविष्यात नेमकं काय बनायचं आहे, याची पुसटशी कल्पना तिने आपल्या पालकांना द्यावी. तसेच तिच्या शिक्षणात काही अडचणी आहेत का? हेदेखील तिच्या पालकाला कळवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलींच्या शिक्षणास चालना मिळावी या उदात्त हेतूने जिल्हा परिषदेने ‘मुलींचे वडील व पालकास पत्र’ हा अभिनव उपक्रम 1 ते 4 सप्टेंबर या कालावधीमध्ये जळगाव जिल्ह्यात राबवला. या उपक्रमांतर्गत जि.प. शाळेतील दीड लाख विद्यार्थ्यांनी आपले पालक किंवा वडील यांना भावनिक पत्र लिहिले. त्यामुळे पालकांच्या डोळ्यात पाणी आले.
या उपक्रमांतर्गत इयत्ता चौथी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींनी आपल्या पालकांना पोस्ट कार्डवर पत्र लिहावे आणि ते पत्र चार सप्टेंबर रोजी जिल्ह्यात एकाच वेळेस टपाल कार्यालयात जाऊन टाकावे, अशी संकल्पना
मांडण्यात आली होती. या संकल्पनेनुसार या योजनेस जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील 2 लाख 22 हजार 355 विद्यार्थिनींपैकी 1 लाख 50 हजार 224 विद्यार्थिनींनी म्हणजे 67 टक्के विद्यार्थिनींनी आपल्या वडिलांना पत्र लिहिले. त्यात वेगवेगळ्या प्रकारचा मजकूर वेगवेगळ्या प्रकारची अनोख्या अशा प्रकारच्या कल्पना आकांक्षा इच्छा मुलींनी व्यक्त केल्या. त्याच्यातली काही बोलकी पत्रे जर बघितली तर असे लक्षात आलं की, एका चिमुकलीला भविष्यात जिल्हाधिकारी व्हायचे आहे. एका चिमुकलीला डॉक्टर व्हायचे आहे. कुणाला वैज्ञानिक व्हायचे आहे. एका मुलीला दरवर्षी वडील ऊस तोडीसाठी घेऊन जात होते तर तिने पत्रात लिहिले वडिलांना बाबा यावर्षी मला ऊस तोडीला घेऊन जाऊ नका, मी इथेच राहणार आहे. अशा प्रकारच्या अनेक चांगल्या संकल्पना मुलींनी आपल्या पालकांना प्रति बोलून दाखवल्या.
मला कलेक्टर व्हायचंय
मला मोठे होऊन खूप शिक्षण घेऊन कलेक्टर व्हायचं आहे आणि समाजाची व देशाची सेवा करायची आहे. इथली व्यवस्था मला बदलायची आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामुळे मला माझ्या वडिलांना पत्र लिहायची संधी मिळाली आहे. पत्रातून मी माझ्या भावना माझ्या वडिलांना कळविले आहेत.
आरती, विद्यार्थिनी, जि. प मराठी शाळा, उपखेड
पप्पा, मला ऊस तोडायला नेऊ नका
मला शिकायची खूप इच्छा आहे आणि शिक्षणाची आवडदेखील आहे, मात्र माझे पप्पा मला ऊस तोडायला घेऊन जातात म्हणून मी पत्रातून पप्पा मला ऊस तोडायला नेऊ नका, असे त्यांना कळविल्यानंतर पत्र वाजताच माझ्या पप्पांनी मला घट्ट मिठी मारले आणि मला आश्वासन दिले आहे की, मी तुला खूप शिकवेल यापुढे ऊस तोडायला येणार नाही.
दिव्या, विद्यार्थिनी, जि.प.मराठी शाळा
कौतुकास्पद अभिनव उपक्रम
जळगाव जिल्हा परिषदेने विद्यार्थिनींसाठी सुरू केलेला हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आणि अभिनव असा आहे. या उपक्रमाबद्दल एक पालक म्हणून आणि शालेय शिक्षण समितीचा सदस्य म्हणून मला अभिमान आहे.
-अनिल चव्हाण, सदस्य, शालेय शिक्षण समिती