अमरावती : भाजपने अमरावती मतदार संघातून नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे. नवनीत राणा यांना तिकीट मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ नाराज आहेत. तसेच महायुतीचा भाग असलेल्या प्रहार या पक्षाचे नेते बच्चू कडू यांनीदेखील राणा यांना विरोध केला आहे. आम्ही अमरावती या जागेसाठी आमचा उमेदवार देणार आहोत. आम्ही राणा यांचा प्रचार करणार नाही, असे कडू यांनी जाहीर केले आहे.
बच्चू कडू काय म्हणाले?
उमेदवारी कोणाला द्यायची हा निर्णय भाजपचा आहे. माझ्यासह जनतेत रोष आहे. हा रोष निकालात दिसणार आहे. नवनीत राणा यांना उमेदवारी दिली हे, चांगलंच झालं आहे. अब मजा आऐगा. प्रहारची भूमिका कायम आहे. येथे प्रहारचे अस्तित्व आहे. आम्ही नियोजनबद्द लढू. आम्ही नवनीत राणा यांचा प्रचार करणार नाही. आमचा स्वतःचा पक्ष आहे. आमच्यावर कोणीही दबाव टाकू शकत नाही, असे बच्चू कडू म्हणाले.