बच्चू कडूंनी लिहलं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : भारतरत्न सचिन तेंडुलकर याची आमदार बच्चू कडू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. सचिन तेंडुलकर हा पेटीएम फर्स्टच्या जाहिरातीतून वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. याचसंबंधी सचिन तेंडुलकरने अशी जाहिरात करु नये असे आवाहन या पत्रातून करण्यात आले आहे.  सचिन तेंडूलकर यांचे लहान पासून मोठ्या लोकांना पर्यंत खुप मोठ्या प्रमाणत चाहते आहे.  जाहिरात ही  लहाना पासून मोठ्यानं पर्यंत पाहिली जाते व तिचा परिणाम सर्वांच्या मनावरती होतो. असे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले आहे.

सचिन तेंडुलकरच्या पेटीएम फर्स्ट जाहिरातीसंदर्भात त्यांच्याकडे प्रितेश पवार नावाच्या तरुणाने तक्रार केली आहे. यानंतर बच्चू कडू यांनी सचिनला ही जाहिरात बंद करण्याचे आवाहन केले आहे. सचिन तेंडुलकर हे भारतरत्न आहेत. त्यांचे देशासह जगभरात असंख्य चाहते आहेत. भारतरत्न असणार्‍या व्यक्तिने पेटीएम फर्स्ट सारख्या जुगार चालवणार्‍या अ‍ॅपची जाहीरात करणे योग्य नाही. माझी महाराष्ट्र शासन आणि सचिन तेंडुलकर यांना विनंती आहे, कृपया या जाहिरातीवर तात्काळ बंदी घालण्यात यावी. असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी केले आहे.