जम्मू: त्रिकुट निवासीनी म्हूणन ओळखल्या वैष्णोदेवी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणत गर्दी असते नेहमीच मंदिरा बाहेर रांगा लागलेल्या असता पण आता खराब हवामानामुळे मंदिराकडे जाणारा नवीन मार्ग बंद करण्यात आला आहे. श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाने खराब हवामान आणि पावसामुळे वैष्णोदेवी गुंफा मंदिराकडे जाणारा नवीन मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रावण आणि अधिकमास महिन्यामुळे मातेच्या दरबारात येणाऱ्या भाविकांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे.
चवेळी डोंगरात धुक्यामुळे कटरा ते सांझी छत ही हेलिकॉप्टर सेवाही गेल्या १५-२० दिवसांपासून प्रभावित झाली आहे.एनआय या वृत्तसंस्थेनुसार, एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, रियासी जिल्ह्यातून मंदिराकडे जाणारी हेलिकॉप्टर सेवाही आज बंद करण्यात आली आहे. मात्र, जुन्या ट्रॅकवरून प्रवास सुरळीत सुरू आहे.