बदलापूर : शहरातील एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आले आहेत. या विरोधात नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश दिसून येत असून यात आरोपीला फाशीची मागणी काण्यात येत आहे. हे प्रकरण गंभीर असल्याने कल्याण बार असोसिएशनशी संलग्न असलेल्या वकिलांनी या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचे वकीलपत्र घेण्यास वकिलांनी नकार दिला आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यासंदर्भात वकिलांनी सांगितले की ते आरोपी अक्षय शिंदेचा न्यायालयात बचाव करणार नाहीत असा पवित्रा घेलता आहे. वकिलांच्या या पावित्र्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीच्या पोलीस कोठडीत 26 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
मागील आठवड्यात शाळेत परिचर म्हणून कार्यरत असलेल्या आरोपीला बुधवारी सकाळी कडेकोट पोलीस बंदोबस्तात जिल्ह्यातील कल्याण येथील दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले.
न्यायालयाने त्याची पोलीस कोठडी 26 ऑगस्टपर्यंत वाढवली. यानंतर पोलिसांनी त्याला एका व्हॅनमधून नेल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान महाविकास आघाडीने 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
बुधवार २१ रोजी बदलापूरमध्ये शाळा बंद होत्या. दरम्यान, प्रशासनाने शहरातील इंटरनेट सेवा बंद केली. या गुन्ह्याच्या निषेधार्थ काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीनेही शनिवार २४ ऑगस्टला बंदची हाक दिली आहे.