जळगाव : शेतकरी यांना प्रलंबित अनुदान व बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यलयासमोर बुधवार , २१ रोजी आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व जळगाव ग्रामीणचे शिवसेना उप जिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे यांनी केले.
बदलापूर येथील एका नामांकित शाळेतील दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी शिवसेना उबाठा जळगाव ग्रामीणच्या वतीने करण्यात आली आहे. हे सरकार नपुंसक आहे पोलीस प्रशासन वर सरकार चा धाक राहिला नसून महाराष्ट्र राज्यात लैंगिक अत्याचार मध्ये सातत्याने वाढ होत आहे,अशी टीका या वेळी शिवसेना उप जिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे यांनी केली आहे
जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आपल्या केळी पीक विमा पासून सत्ताधारी मंत्री व आमदार यांच्या अपूर्ण अभ्यासामुळे वंचीत राहिले आहेत. तसेच ५० हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्यात आलेले नाही. ठिबक अनुदानापासून सुद्धा शेतकरी वंचीत आहे. उडीद,मूग,सोयाबीन,कापूस या खरीप पीकविमा अनुदान प्रति हेक्टरी ५००० रुपये अर्थसहाय्य योजनेचा लाभ मिळाला नाही कारण की बरेच शेतकरी यांचे नाव वगळण्यात आले आहेत अशी माहिती शिवसेना उप जिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब यांनी दिली आहे.
शिवसेना महानगर प्रमुख मनीषा पाटील, गुलाबराव कांबळे, किरण पाटील, विनायक धर्माधिकारी, छगन खडसे, हिरालाल कोळी, किरण ठाकूर, रमाकांत कदम, रवींद्र मोरे, प्रकाश सोनवणे, दिलीप सोनवणे, अनिल साळुंखे, विनोद सपकाळे, दीपक कोळी व महिला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.