जळगाव : भरारी फाउंडेशनतर्फे गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या बहिणाबाई महोत्सवाचा सोमवारी सायंकाळी समारोप झाला. यावेळी चित्रकला, रांगोळी, मेहंदी स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यादरम्यान विविध बचत गट व लघु उद्योगांची त्यांच्या मालाच्या विक्रीतून १ कोटी ३० लाखांची उलाढाल झाल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी सांगितले.
महोत्सवात बचत गटांनी विक्रीस ठेवलेले खाद्य पदार्थ, दैनंदिन गृहोपयोगी वस्तू यांना ग्राहकाची विक्रमी दाद या आर्थिक उलाढालीतून यंदा मिळाली. याठिकाणी सुक्ष्म व लघु उद्योग मंत्रालय भारत सरकार यांच्यावतीने उद्योगांना चालना देण्यासाठी विविध उत्पादनांचे स्टॉल तसेच आतंरराष्ट्रीय तृणधान्ये वर्षाच्या निमित्ताने कृषी विभागातर्फे उभारण्यात आलेल्या तृणधान्यांबाबत जनजागृती प्रदर्शन विशेष आकर्षण ठरले. महोत्सवाच्या दरम्यान सुमारे एक लाख नागरिकांनी भेटी दिल्या.
याप्रसंगी शाहीर विनोद ढगे, सचिन महाजन व सहकारी यांनी “जागर लोककलेचा” या कार्यक्रमाने केला. यावेळी आ. सुरेश भोळे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, उद्योगपती रजनीकांत कोठारी, भालचंद्र पाटील, किशोर ढाके, कुशल गांधी, डॉ.परेश दोशी, राजेश चौधरी आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सचिन महाजन, मोहित पाटील, गोपाळ कापडणे, अक्षय सोनवणे, हितेश चौधरी, विक्रांत चौधरी, रितेश लिमडा, स्वप्नील वाघ, अरविंद पाटील, अवधूत दलाल, सचिन मुसळे, अभिषेक बोरसे यांनी परिश्रम घेतले सुत्रसंचलन विनोद ढगे यांनी केले.