शहरात बहिणाबाई महोत्सव 19 मार्चपासून

 

तरुण भारत लाईव्ह ।११ जानेवारी २०२३। खान्देशाच्या सांस्कृतिक चळवळीला बळ देणारा बचत गटाच्या महिलांना आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरलेला बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन 19 ते 23 जानेवारीपासून बॅ. निकम चौक, सागर पार्क, जळगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून पाच दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन या महोत्सवात करण्यात आलेले असल्याची माहिती भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी व महोत्सवाचे सचिव विनोद ढगे यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

महोत्सवासंदर्भात माहिती देताना दीपक परदेशी म्हणाले, महिला बचत गटाने निर्माण केलेल्या वस्तूंना हक्काच व्यासपीठ निर्माण व्हावं, त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंना योग्य ती किंमत मिळावी व त्यातुन त्यांची आर्थिक उन्नती व विकास व्हावा हा मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. महिला बचत गटांचा वाढता प्रतिसाद पाहता या महोत्सवात जळगावसह खान्देशातील 140 महिला बचत गट खान्देशाबाहेरील नामवंत अशी 30 महिला बचत गट अशी 230 बचत गटांना नाममात्र दरात या महोत्सवात स्टॉल उपलब्ध करून देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या सूक्ष्म व लघु मंत्रालयाने लघु उद्योजकांना चालना मिळण्यासाठी सूक्ष्म व लघु उद्योगाचे काही स्टॉल महोत्सवात लावण्यात येणार आहे. तसेच 2023 हे वर्ष अंतर राष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी

प्रामुख्याने खान्देशातील लोककला व लोककलावंतांच्या जतन व संवर्धनाच्या प्रक्रियेत बहिणाबाई महोत्सव आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. खान्देशातील विविध लोककला शाहीरी, भारूड, लोकगीते, वहीगायन, आदी लोककलांबरोबरच शालेय व महाविद्यालयीन युवा कलावंतांना आपली कला सादर करण्यासाठी बहीणाबाई महोत्सवाचा सांस्कृतिक मंच खुला ठेवण्यात आला आहे. खान्देशातील लोककलेसोबतच महाराष्ट्रातील नामवंत अशी लोककलावंतांना यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

बहिणाबाई खाद्य महोत्सव

बहिणाबाई महोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे बहिणाबाई खाद्य महोत्सव बचत गटाने तयार केलेल्या विविध खाद्य पदार्थाना जळगांव नागरीकांची विशेष मागणी असते भरीत भाकरी, शेवभाजी, खापरावरील पुरण पोळीसह खान्देशातील विविध खाद्य पदार्थाांचा या महोत्सवाच्या निमित्ताने जळगावकर नागरिक आस्वाद घेत असतात.

बहिणाबाई पुरस्कार व बहीणाबाई विशेष सन्मान

सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व महिला विकासाच्या क्षेत्रात कार्य करणार्‍या व्यक्तींना दरवर्षी बहिणाबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. खान्देशासह राज्यभरात विविध क्षेत्रात कार्य करणार्‍या दहा व्यक्तींना बहिणाबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावर्षी बहिणाबाई सांस्कृतिक सन्मान या विशेष पुरस्काराने खान्देशासह राज्यभरातील सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्ती संस्थाचा गौरव या महोत्सवात करण्यात येणार आहेत.