---Advertisement---
जळगाव : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३३ वी जयंतीनिमित्ताने बहुजन व्हालंटरी फोर्सतर्फे शिस्तबध्द मानवंदना देण्यात आली. यात अबालवृद्ध बीव्हीएफ जवानांचा समावेश होता. फोर्सच्या शेकडो जवानांची अभिवादन रॅली खान्देश मॉल,गोविदा रिक्षा स्टॉप,नेहरु पुतळा ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली. डॉ.बाबासाहेब यांना मानवंदना देऊन त्यांच्या पुतळ्यास सुमित्र अहिरे, सुनिल सोनवणे, प्रकाश इंगळे, अरुण म्हस्के, रविंद्र सोनवणे, गोविंदा इंगळे, संजीव सोनवणे, उज्ज्वला इंगळे, कल्पना म्हस्के,कैलास पद्मने, भक्ती पद्मने या जवानांनी माल्यार्पण केले.
अभिवादन रॅलीत प्रा.डॉ.प्रकाश का़बळे,प्रा.मिनाक्षी वाघमारे, प्रा. मनोज मोरे, राहुल अहिरे,अरुण बागुल, प्रकाश सोनवणे, जितेंद्र साळुंके, देवानंद निकम, सुनिल देहडे, राहुल सोनवणे, सुभाष नरवाडे, प्रा. डॉ. रविंद्र मेंढे, सुकलाल पेंढारकर, राष्ट्रपाल सुरडकर, खुशाल सोनवणे, भगवान कांबळे, डॉ.शाकीर शेख,संजय कदम,भागवत सुतार,सागर भालेराव,योगेश भालेराव,निलु इंगळे,एड.आनंद कोचुरे, रविंद्र निकम,दिलीप तायडे,शेखर इंगळे,सुनिता लांडगे,रोशनी निकम, अपर्णा निकम, राजश्री अहिरे, ईरावती अहिरे, सोनी सोनवणे, दिपाली पेंढारकर, अनिता पेंढारकर, किशोर म्हस्के, मुकुंदा इंगळे,बडगे,मंगला सुरडकर,साधना कदम,रेखा सोनवणे,कल्पना सपकाळे,सोहील शेख इ.शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.