मुंबई : Baipana Bhari Deva दिग्दर्शक केदार शिंदे यांचा बहुचर्चित चित्रपट ‘बाईपण भारी देवा’ 30 जून रोजी प्रदर्शित झाला. आणि या चित्रपटाने बायकांच्या मनामध्ये घर केलं आहे.चित्रपटाला महाराष्ट्रात ठिकठिकाणी बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्लचा बोर्ड लागला आहे. हा चित्रपट पहिल्याच आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा या वर्षातला सुपरहिट मराठी चित्रपट ठरला आहे.आता दुसऱ्या आठ्वड्यापर्यंत चित्रपटाची कमाईत जवळजवळ तिप्पट वाढ झाली आहे.
सोमवार 10 जुलै पर्यंत चित्रपटाने 26. 19 कोटींचा गल्ला जमवला आहे.त्यामुळे हा या वर्षातील आतापर्यंतचा सगळ्यात जास्त सुपरहिट चित्रपट ठरू शकतो. महाराष्ट्रात महिला वर्ग या चित्रपटाला अजूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहे. येणाऱ्या आठवड्यात चित्रपटाच्या एकूण कमाईत अजून वाढ होऊ शकते. याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.