बेकरी प्रोडक्ट डिलेव्हरीसाठी नेत असताना आयशर वाहनाला लागली अचानक आग

रावेर :  बेकरी प्रोडक्ट डिलेव्हरीसाठी नेत असताना आयशर वाहनात शॉर्ट सर्किट झाल्यानंतर वाहनाला अचानक आग लागली. आगीमुळे वाहनातील न टोस्टसह अन्य बेकरी प्रोडक्ट व . वाहन जळाल्याने तब्बल २४ लाखांचे नुकसान झाले. याप्रकरणी रावेर पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.आयशर चालक सोहेल खान नूर मोहम्मद (३०, संजय नगर, खरगोन, मध्यप्रदेश)

यांनी रावेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार,कुसुंबा ते लालमाती दरम्यान ते आयशर वाहनातून बेकरी प्रोडक्ट डिलेव्हरीसाठी आणत असताना आयशर (सी.जी.०४ एन.व्ही.४०३९) च्या क्लीनर बाजूच्या फ्यूज बॉक्समध्ये शॉर्ट सर्किट झाले व वाहनाला आग लागली. या आगीमुळे २१ लाख रुपये किंमतीचे आयशर वाहन व तीन लाख चार हजार रुपये किंमतीचे बेकरी प्रोडक्ट व टोस्ट जळाले. हा प्रकार शनिवार, २० रोजी रात्री १२ वाजता घडला. तपास हवालदार सतीश सानप करीत आहेत.