---Advertisement---

Parola News : मुख्यमंत्री माझी शाळा: बालाजी विद्यालय तालुक्यातून प्रथम

by team
---Advertisement---

पारोळा : येथील बालाजी विद्यालयाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा २ उपक्रमात खाजगी प्राथमिक शाळा संवर्गातून तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

जळगाव जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषद शाळा व खाजगी प्राथमिक शाळा तालुकास्तरीय बक्षीस वितरण सोहळा पंचायत समिती (पारोळा) येथे संपन्न झाला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आ. अमोल पाटील होते.

सुरुवातीला आ. अमोल पाटील व व्यासपीठावरील मान्यवरांनी प्रतिमापूजन केले. तसेच महाराष्ट्र शासना अंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा २ तालुकास्तरीय प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या शाळा तसेच शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती करणारे शिक्षक व उल्लेखनीय काम करणाऱ्या मदतनिस यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खाजगी प्राथमिक शाळा मधून तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान श्री बालाजी विद्याप्रबोधिनी मंडळ संचलित प्राथमिक विद्यालयाला मिळाला. आ.पाटील यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यू. एच. करोडपती, संस्थेचे सचिव डॉ. सचिन बडगुजर, संचालक डॉ. चेतन करोडपती, मुख्याध्यापक हेमंतकुमार पाटील, प्राचार्य विजय बडगुजर व शाळेतील शिक्षक वृंद यांना धनादेश, प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन सत्कार करून गौरवण्यात आले. याप्रसंगी तालुक्यातील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे तालुका प्रमुख मधुकर पाटील, मुख्याधिकारी तथा प्रशासक किशोर चव्हाण, गटविकास अधिकारी संजय मोरे, गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील, शा.पो.आ. चंद्रकांत चौधरी, बालाजी संस्थेचे अध्यक्ष यू. एच. करोडपती, डॉ. सचिन बडगुजर, डॉ. चेतन करोडपती, रवींद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment