---Advertisement---
शहरातील जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याचा तपास निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या आणि आरोपपत्रामध्ये एकूण ४५ जणांना आरोपी म्हणून नामांकित केले आहे. यात एक वकील तसेच एजंट या दोघांचा समावेश आहे. या घोटाळ्याला बांगलादेश कनेक्शन असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.
या अर्जदारांनी बनावट पद्धतीने तहसीलदार जळगाव यांच्या स्वाक्षऱ्या करून, खोटे आदेश तयार केले. ते आदेश जळगाव महापालिकेत सादर करून बनावट जन्म प्रमाणपत्रे प्राप्त करण्याचा प्रयत्न केला होता. या गुन्ह्यातील कारस्थानामुळे हा विषय राज्यात चर्चेचा मुद्दा ठरला होता. एकाच वेळी महापालिकेत ५० जन्म मृत्यू दाखले प्रकरणे कशी दाखल झाली, याबाबत तालुका तहसीलदारांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
गंभीर गुन्ह्यात ४३ संशयितांची वाढ
शिरीष बानो फारीक शाह, आरीफ खान इसा खान, बान असुदुल्ला खान हाफीज, शाह आसिफ अहमद, शमशेर बेग तुराब वेग, तौसीफ शहा जनिउल्ला शाहा, तुराब वेग गुलाब वेग, शहनाज वी. शेख मुनीर, वाहेदाबी अब्दुलगनी, अब्दुल्ला असगर अली सैय्यद, नुसरत बानो, जबीउल्ला शाहा, शाहा आयाज अहमद अब्दुल अजीज, मोहम्मद वसीम जबीमुल्ला शाहा, मोहम्मद जफर जवीउल्ला शाहा, जनीक परवीन अमानउल्ला शाहा, बिसमिल्लाह खान, शेख सलीम शेख बसीर, शेख अनीस शेख बसीर, मोहम्मद अकील शेख बसीर, मोहम्मद कलीम शेख बसीर, शरीफ नईमोद्दीन, मोहम्मद शकील शेख बसीर, अमरीन रशिद पटेल, जाकीर फकीर मोहम्मद तांबोळी, तबस्सुम परवीन मोहम्मद इकबाल, शेख मोहम्मद इकबाल अब्दुल रहीम, राहत नाज जबीउल्ला शाहा, अंजुमबी शेख फरीद, तसलीमा बी शेख यासिम, शोहरत अली शरीफ मुनसारी, शेख शानदोस शेख ईसाक, चांद मोहम्मद प्यारजी बागवान, असलम खान सादीक खान, अशफाक बुढान बागवान, कनिज रज्जाबी अब्दुलगनी, बुशरा खान मोहम्मद इस्लाउद्दीन, मोहसीन चांद मोहम्मद, निगार सुलताना हफिज खान, समीर खान आयुब खान, नसरिन बानो आयुब खान, अफजलखान अय्युब खान, नदिमखान हफिजखान.
या संशयितांविरुद्ध भारतीय दंडसंहितेतील कलम ४२० (फसवणूक), ४०६ (विश्वासघात), ४६७, ४६८, ४७१ (बनावट कागदपत्रे तयार करणे व वापरणे) यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी सविस्तर आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्याची तयारी दर्शविली लवकरच दोषारोपपत्र असून, न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.
या प्रकरणामुळे जिल्ह्यातच नव्हे; तर राज्यभरात मोठी खळबळ माजली आहे. किरीट सोमय्या यांनी उघड केलेल्या या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याच्या चौकशीमुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.