भारतीय नागरिकांसाठी सर्व व्हिसा सेवा पुन्हा सुरू, बांगलादेश सरकारचा निर्णय

---Advertisement---

 

ढाका : दोन महिन्यांपासून निलंबित असलेली व्हिसा सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय बांगलादेशचे नवनिर्वाचित पंतप्रधान तारिक रहमान यांनी घेतला. राजधानी दिल्लीतील बांगलादेश उच्चायोगाने भारतीय नागरिकांसाठी सर्व व्हिसा सेवा सुरू करण्यात येत असल्याचे शुक्रवारी जाहीर केले. हा निर्णय भारत आणि बांगलादेशमधील संबंध सुधारण्याचे संकेत आहे.

भारतविरोधी विद्यार्थी नेता उस्मान हादी यांच्या हत्येनंतर झालेल्या देशव्यापी निदर्शनामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले आणि यातूनच बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे सल्लागार मोहम्मद युनूस यांनी भारतीय नागरिकांसाठी व्हिसा सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी कोलकात्ता, मुंबईतील व्हिसा प्रदान करणारी कार्यालये बंद करण्याचे निर्देश दिले होते. भारताने देखील ढाका येथील भारतीय व्हिसा अर्ज केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशात तारिक रहमान यांच्या नेतृत्वात नवीन सरकार स्थापन झाल्याच्या चार दिवसांतच भारतीय नागरिकांसाठी सर्व व्हिसा सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. भारत-बांगलादेश संबंध सुधारण्याच्या दिशेने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

बांगलादेश उच्चायुक्तालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, भारतीय नागरिकांसाठी निलंबित केलेली व्हिसा सेवा पुन्हा सुरू करण्यात येत आहे. द्विपक्षीय संबंध सुधारण्यास सरकारचे प्राधान्य आहे. भारतानेही बांगलादेशी नागरिकांसाठी सर्व व्हिसा सेवा पूर्णपणे पुनर्संचयित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे म्हटले आहे.

रहमान यांना भारत भेटीचे निमंत्रण

लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने रहमान यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थिती लावली आणि त्यांची भेट घेतली. बिर्ला यांनी मोदींचे पत्र सादर केले आणि रहमान यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले. तारिक रहमान यांच्या नेतृत्वात दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याच्या दिशेने याकडे पाहिले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---