---Advertisement---

बांगलादेशची नवी चाल! Bangladesh-Hindu-violence चीनचा हात? सिंगापूरची कंपनी!

by team
---Advertisement---

Bangladesh-Hindu-violence भारत प्रामाणिकपणे बांगलादेशासाेबतचे संबंध पूर्ववत् करण्याचा जाेरदार प्रयत्न करीत असताना, बांगलादेश मात्र हे संबंध अधिक बिघडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आता स्पष्ट हाेऊ लागले आहे. बांगलादेशातील हिंदूंवर हल्ले केले असताना बांगलादेशने एक माेठा निर्णय घेत भारताला एक प्रतिकूल संदेश दिला आहे. बांगलादेश दूरसंचार नियामक आयाेगाने भारताशी झालेला एक करार रद्द करण्याचा निर्णय घाेषित केला आहे.

Bangladesh-Hindu-violence पूर्वाेत्तर भागाचा उर्वरित भारताशी संपर्क वाढविण्यासाठी बांगलादेशाला लागून असलेल्या भागात काही दूरसंचार मनाेरे उभारण्याचा करार दाेन्ही देशांत काही महिन्यांपूर्वी करण्यात आला हाेता. याचा भारताला हाेणारा माेठा फायदा म्हणजे पूर्वाेत्तर भागातील कमकुवत दूरसंचार व्यवस्था बळकट हाेणार हाेती. बांगलादेशने हा करारच रद्द करून भारताला माेठा धक्का दिला आहे.

चीनचा हात? : बांगलादेश आपल्या अंतर्गत मामल्यांमध्ये गुंतला असताना, त्याने नेमका हा करार रद्द करण्याचा निर्णय करावा यामागे चीन असल्याचे म्हटले जात आहे. Bangladesh-Hindu-violence भारताच्या पूर्वाेत्तर भागावर चीनचा डाेळा असल्याचे मानले जाते. बांगलादेशचा ताजा निर्णय केवळ चीनच्या सांगण्यावरून केला गेला असल्याचे भारताला वाटत आहे. भारताने पूर्वाेत्तर भागाशी आपला संपर्क वाढवू नये अशी चीनची इच्छा राहात गेली आहे. कारण यातील काही आपला असल्याचा दावा चीन अनेक वर्षांपासून करीत आहे. बांगलादेशने चीनची ही भूमिका विचारात घेऊनच हा निर्णय केला असल्याचे मानले जाते.

Bangladesh-Hindu-violence सिंगापूरची कंपनी : भारत-बांगलादेश यांच्यात अखरुआ भागातून भारताला वेगवान दूरसंचार व्यवस्था करून देण्यासाठी सिंगापूरच्या दाेन कंपन्या, भारतीय कंपनी भारती टेलिकाॅम व बांगलादेश दूरसंचार आयाेग यांच्यात एक करार करण्यात आला हाेता. या कराराचा भारताला फायदा हाेणारच आहे; बांगलादेशाला मात्र काेणताही आर्थिक फायदा हाेणार नाही, असे सांगून बांगलादेशने हा करार रद्द करण्याची घाेषणा केली आहे.

Bangladesh-Hindu-violence दाेन कंपन्या : सिंगापूरमधील समिट कम्युनिकेशन्स व फायबर एट हाेम या कंपन्यांच्या माध्यमातून हे काम केले जाणार हाेते. विशेष म्हणजे या कंपन्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या जवळच्या मानल्या जातात. या दाेन्ही कंपन्यांचे प्रमुख माेहम्मद फरीद खान हे असून ते शेख हसीना यांच्या अवामी लीगचे खासदार फारीख खान यांचे लहान बंधू आहेत. म्हणजे एकीकडे शेख हसीना यांना संदेश देणे व दुसरीकडे चीनची मागणी पूर्ण करणे ही दाेन उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे मानले जाते. शेख हसीना यांना भारताने आश्रय देणे बांगलादेशला आवडलेले नाही. भारताने शेख हसीना यांना बांगलादेशकडे साेपवावे; जेणेकरून त्यांच्यावर विविध गुन्ह्यांखाली खटला चालविता येईल, अशी बांगलादेश सरकारची भूमिका राहिलेली आहे. भारताने ही मागणी नाकारून याेग्य निर्णय घेतला आहे. भारताने शेख हसीना यांना सरकारी आश्रय देत त्यांच्या सुरक्षेची पूर्ण व्यवस्था केली आहे.

Bangladesh-Hindu-violence हिंदूंवर हल्ले : बांगलादेशातील हिंदूंवर पुन्हा जे सुनियाेजित हल्ले केले जात आहेत ते भारताची चिंता वाढविणारे आहेत. भारताने याबाबत आपली भूमिका बांगलादेश सरकारकडे नाेंदविली असली, तरी हा आमचा अंतर्गत मामला असल्याचे बेदरकार उत्तर बांगलादेशने दिले आहे. भारताच्या परराष्ट्र सचिवांनी नुकतीच बांगला देशला भेट देत तेथील नेत्यांशी झालेल्या चर्चेत हिंदूंवरील अत्याचाराचा, हल्ल्यांचा मुद्दा उपस्थित केला. बांगलादेशातील सत्तांतरानंतर लगेचच काही हिंदू मंदिरांवर हल्ले करण्यात आले हाेते. त्यावेळी बांगलादेशचे कार्यकारी प्रमुख माेहम्मद युनूस यांनी याेग्य भूमिका घेत या हल्ल्यांचा निषेध केला हाेता. आता त्यांची ‘ती‘ भूमिका राहिलेली नाही असे दिसते. बांगलादेशच्या बाेलण्यात-वागण्यात आलेला मुजाेरपणा भारताच्या नजरेतून सुटलेला नाही. चीनच्या पाठिंब्याशिवाय बांगलादेश हे करू शकत नाही, याची स्पष्ट कल्पना भारत सरकारला आली आहे. यामुळे बांगलादेशशी संबंध सुधारण्याऐवजी ते अधिक कमजाेर हाेत असल्याचे भारताला वाटत आहे.

Bangladesh-Hindu-violence साखर आयात : एक काळ हाेता बांगलादेश व पाकिस्तान यांच्यातून विस्तव जात नव्हता. बांगलादेशची निर्मितीच मुळी पाकिस्तान विराेधाच्या मुद्यावर झाली हाेती. सध्याचा पाकिस्तान म्हणजे पश्चिम पाकिस्तानवर पंजाबींचा पगडा हाेता तर बांगलादेशवर म्हणजे पूर्व पाकिस्तानवर बंगाल संस्कृतीचा पगडा हाेता. त्यातूनच दाेन्ही देशांतील वैर वाढत गेले आणि त्याचे पर्यवसान पाकिस्तानचे दाेन तुकडे हाेण्यात झाले हाेते. 1971 मधील पाकिस्तानच्या विभाजनानंतर दाेन्ही देशांतील संबंध कधीच मधुर राहिले नव्हते. शेख हसीना यांचे सरकार उलथवून पाडण्यात आल्यानंतर मात्र या दाेन देशांतील संबंधात अचानक गाेडवा आला आहे असे दिसते. पाकिस्तानने बांगलादेशातील साखरेचा तुटवडा दूर करण्यासाठी या देशाला साखर निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पाकिस्तानी साखर बांगलादेशात पाेहाेचू लागली आहे. बांगलादेश व पाकिस्तान यांच्यातील व्यापार वाढविण्याचा पद्धतशीर प्रयत्न बांगलादेशातील हंगामी सरकार करीत असल्याचे दिसून येत आहे.

Bangladesh-Hindu-violence चीनचा पाठिंबा : पाकिस्तानला चीनचा पाठिंबा आहे हे तर आता साऱ्या जगाला माहीत झाले आहे. मात्र, बांगलादेशात झालेल्या सत्तांतरात चीनच्या सहभागाचे ठाेस पुरावे अद्याप समाेर आलेले नाहीत. चीनच्या सक्रिय सहभागाशिवाय बांगलादेशात एवढी माेठी उलथापालथ हाेणे शक्य नव्हते, असे मानले जाते.

Bangladesh-Hindu-violence आणखी काही करार : बांगलादेश दूरसंचार नियामक आयाेगाने भारतासाेबत असणारा करार रद्द करण्याची घाेषणा केली आहेच. येणाऱ्या काळात असे आणखी काही करार रद्द करण्याची घाेषणा बांगलादेश सरकारकडून केली जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे बांगलादेशातील अनेक पायाभूत प्रकल्पांमध्ये भारतीय कंपन्या काम करीत आहेत. त्यांनाही काम करणे अवघड हाेईल, अशी स्थिती या देशात तयार केली जाण्याची शक्यता आहे. हे सारे ठेके नंतर चिनी कंपन्यांना दिले जातील, असे मानले जाते.

Bangladesh-Hindu-violence माेठे आव्हान : बांगलादेश आजवर भारताचा साथीदार राहिला आहे. पाकिस्तान, नेपाळ, अ\गाणिस्तान, भूतान, श्रीलंका यांनी अप्रत्यक्षपणे चीनचे मांडलिकत्व पत्करले असतानाही बांगलादेशने भारताची साथ साेडली नव्हती. मात्र, शेख हसीना यांचे सरकार उलथविल्यानंतर तेथे सत्तेवर आलेल्या नव्या सरकारने भारतविराेधी निर्णय घेण्याची एक मालिका जणू सुरू केली आहे. ही मालिका खंडित करून दाेन्ही देशातील संबंध पुन्हा सुरळीत करण्याचे माेठे आव्हान भारतासमाेर उभे ठाकले आहे.

Bangladesh-Hindu-violence एकमेव आशा : बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात भारताने बजावलेली भूमिका बांगलादेशी नागरिक विसरणार नाहीत. सत्तांतराचा धुरळा खाली बसल्यानंतर आपला खरा मित्र काेण आणि शत्रू काेण हे बांगलादेश नागरिकांच्या लक्षात येईल आणि दाेन्ही देशांतील संबंधात आलेला दुरावा दूर हाेईल, अशी आशा भारताला वाटत आहे. बांगलादेश सरकार, पाकिस्तान व चीन यांनी भारतविराेधी भूमिका घेण्याचा सपाटा लावला आहे. अशा स्थितीत बांगलादेशची जनता हाच भारतासाठी आशेचा एकमेव किरण आहे. असेच मालदीवमध्ये झाले हाेते. स्थानिक जनतेच्या दबावामुळे मालदीव सरकारला भारताशी जुळवून घ्यावे लागले हाेते. अशीच स्थिती बांगलादेश सरकारसाठी तयार व्हावी, अशी आशा करण्याव्यतिरिक्त आज तरी भारताच्या हाती काहीही नाही.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment