भारतात वर्षभर विविध सण समारंभ मोठ्या उत्सहाने साजरे करण्याची परंपरा आहे. वर्षभरात त्या त्या महिन्याला सणानिमित्ताने बँकांना देखील सुटी असते. यावर्षी बँकांना सर्वाधिक सुट्या ह्या ऑक्टोबर महिन्यात आल्या आहेत. या यादीत बँकेने सांगितले की, कोणत्या तारखेला कोणत्या शहरातील बँका कोणत्या कारणामुळे बंद राहणार आहेत.
प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिद्वारा बँकेसंबंधीच्या सुट्यांची यादी जाहीर करण्यात येते. यानुसार, ऑक्टोबर महिन्यात ३१ दिवसातील जवळपास १५ दिवस सुट्टी असणार आहे. यात शनिवार, रविवारच्या सुट्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यात गांधी जयंती , नवरात्री , दसरा आणि दिवाळीच्या सुट्या आहेत. या दिवशी बँका बंद असतील.
१ ऑक्टोबर – विधानसभा निवडणुकीसाठी जम्मू आणि काश्मीरमध्ये बँका बंद
२ ऑक्टोबर – गांधी जयंतीमुळे संपूर्ण देशात बँकांना सुट्टी असेल
३ ऑक्टोबर – नवरात्रीमुळे जयपूर येथे बँकांना सुट्टी
६ ऑक्टोबर – रविवारमुळे संपूर्ण देशातील बँकांना ताळे
१० ऑक्टोबर – दुर्गा पूजा, दसरा आणि महासप्तमीमुळे अगरतळा, गुवाहाटी, कोहिमा आणि कोलकत्तामध्ये बँकांना कुलूप
११ ऑक्टोबर – दसरा, महाअष्टमी, महानवमी, आयुध पूजा, दुर्गा पूजा, आणि दुर्गा अष्टमीमुळे अगरतळा, बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, इंफाल, ईटानगर, कोहिमा, इंफाल, कोलकत्ता, पाटणा, रांची आणि शिलांगमध्ये बँकांचे शटर डाऊन
१२ ऑक्टोबर – दसरा, विजयादशमी, दुर्गा पूजेमुळे जवळपास संपूर्ण देशातील बँका बंद
१३ ऑक्टोबर – रविवारमुळे संपूर्ण देशात बँकांना असेल ताळे
१४ ऑक्टोबर – दुर्गा पूजेमुळे गंगटोकमधील बँकांना सुट्टी
१६ ऑक्टोबर – लक्ष्मी पूजेसाठी अगरतळा आणि कोलकत्ता येथील बँकांना कुलूप
१७ ऑक्टोबर – महर्षि वाल्मीकि जयंती आणि कांटी बिहू सणानिमित्त बेंगळुरू आणि गुवाहाटीतील बँकांना सुट्टी
२० ऑक्टोबर – रविवारमुळे बँकांना सुट्टी
२६ ऑक्टोबर – चौथ्या शनिवारमुळे देशातील बँकांना सुट्टी
२७ ऑक्टोबर – रविवार असल्याने बँकांना सरकारी सुट्टी
३१ ऑक्टोबर – दिवाळीमुळे देशभरातील बँकांना सुट्टी
ऑनलाईन बँकिंग सेवा सुरुसुट्टीच्या दिवशी ग्राहकांना बॅंकेच्या शाखेत जाऊन त्यांचे पैसे जमा करता येणार नाहीत किंवा शाखेतून पैसे काढता येणार नाहीत. परंतु एटीएममध्ये अशा सेवा उपलब्ध राहतील. ऑनलाईन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करता येईल. क्रेडिट, डेबिट कार्ड आणि युपीआयचा वापर करुन ऑनलाईन पेमेंट करता येईल.