टीम इंडिया श्रीलंकेत दाखल झाली असून येत्या २७ जुलैपासून टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यापासून गौतम गंभीरचा टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ सुरु होणार आहे.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी कार्यभार हाती घेतला आहे. श्रीलंका दौऱ्यापासून त्यांच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळाला सुरुवात झाली आहे. टीम इंडिया श्रीलंकेत दाखल झाली असून येत्या २७ जुलैपासून टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी-२० साठी टीम इंडियाच्या कर्णधारपदी नियुक्त करण्याता आलेल्या सूर्यकुमार आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसाठी या दौऱ्यापासून नव्या प्रवासाची सुरुवात होणार आहे.
गौतम गंभीरसाठी उघडला खजाना
मीडिया रिपोर्टनुसार बीसीसीआयने गौतम गंभीरसाठी खजाना उघडून दिला आहे. बीसीसीआयने गंभीरला किती कोटींचं पॅकेज दिलं आहे, याची माहिती आता समोर आली आहे. बीसीसीआयतर्फे गौतम गंभीरला १२ कोटी रुपये वार्षिक पगार मिळणार असल्याचं बोललं जातंय. म्हणजेच महिन्याला एक कोटी रुपये मिळणार आहेत. याशिवाय इतर सुविधाही गौतम गंभीरला दिल्या जाणार आहेत.
१६ दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यासाठी किती रुपये दिले?
रिपोर्टनुसार केवळ १२ कोटी रुपये पगारच नाही तर परदेश दौऱ्याचा भत्ता आणि अलिशान सुविधाही दिल्या जाणार आहेत. परदेश दौऱ्यावर गंभीरला दिवसाचा २१ हजार रुपये भत्ता दिला जाणार आहे. टीम इंडिया सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. गौतम गंभीरही टीम इंडियासोबत २२ जुलैला श्रीलंकेत दाखल झालाय. हा दौरा ७ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. म्हणजे गौतम गंभीर १६ दिवस श्रीलंकेत असणार आहे. सोळा दिवसांच्या हिशोबाने गंभीरला ३,३६,००० भत्ता मिळणार आहे.
पगार आणि भत्त्याशिवाय गौतम गंभीरला परदेश दौऱ्यावेळी विमानाचं बिझनेस क्लास तिकिट, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहाण्याची सुविधा पुरवली जाणार आहे.
भारताचा श्रीलंका दौरा (IND vs Sri Lanka Revised Schedule)
२७ जुलै – पहिला टी-ट्वेंटी सामना, पल्लेकेले
२८ जुलै – दुसरा टी-ट्वेंटी सामना, पल्लेकेले
३० जुलै – तिसरा टी-ट्वेंटी सामना, पल्लेकेले
२ ऑगस्ट – पहिली वनडे, कोलंबो
४ ऑगस्ट – दुसरी वनडे, कोलंबो
७ ऑगस्ट – तिसरी वनडे, कोलंबो
भारतीयी वेळेनुसार कधी सामने
भारत आणि श्रीलंकादरम्यानचे टी-२० सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरु होणार आहे. तर एकदिवसीय सामन्यांची सुरुवात भारतीय वेळेनुसार दुपारी २:३० वाजता होणार आहे.