तरुण भारत लाईव्ह न्यूज । २ डिसेंबर २०२२ । उत्तर प्रदेशातील अलिगढ येथील सोमना रेल्वे स्टेशनवर निलांचल एक्स्प्रेसमध्ये खिडकीजवळ बसलेल्या प्रवाशाच्या मानेत घुसला लोखंडी रॉड घुसल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी घटना घडली.
हरकेश दुबे रा.सुल्तानपूर असं मृत्यू झालेल्या प्रवाशाचं नाव आहे. निलांचल एक्स्प्रेसच्या सेकंड क्लास डब्यातील १५ नंबरच्या कोचवर एका प्रवाशी बसला होता. या दुर्घटनेनंतर जीआरआपी आणि आरपीएफचे जवान रेल्वे बोगीत पोहोचले असता ही घटना निदर्शनास आली. त्याच्याजवळच्या तिकीटावरुन हे स्पष्ट झालंय की तो दिल्लीहून लखनऊला निघाला होता.
उत्तर मध्य रेल्वेचे प्रमुख जनसंपर्क अधिकारी हिमांशू शेखर उपाध्याय यांनी सांगितलं की, निलांचल एक्स्प्रेसमध्ये सोमना स्टेशनजवळ एक लोखंडी रॉड या कोचजवळ आला. हा रॉड थेट खिडकीतून काच फोडून खिडकीजवळ बसलेल्या हरकेश कुमार दुबे यांच्या मानेत घुसला. या दुःखद घटनेची चौकशी आरपीएफ आणि जीआरपी संयुक्तपणे करत आहे. पण हा रॉड बाहेरुन येऊन प्रवाशाच्या मानेत कसा घुसला याचं उत्तर अद्याप तपास यंत्रणांकडे नाही. हा रॉड रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचं काम करण्यासाठी लाईनमॅन वापरतात तो रॉड आहे.
घटनास्थळावरील दृश्य पाहता, हा अंदाज वर्तवला जातोय की, खिडकीतून घुसलेला रॉड इतक्या वेगानं आत आला की, तो प्रवाशाच्या मानेत घुसून सीटच्या मागे असलेल्या स्टीलच्या शीटला फाडून पुढे गेला. विशेष म्हणजे हा रॉड जर खिडकीला आणि काचेला स्पर्श करुन आला असेल तर तो दुसरीकडे वळला नाही. मृत्यू पावलेल्या प्रवाशाचा मृतदेह हा या रॉडसह आहे त्याच बसलेल्या अवस्थेत स्थिर होता.