जळगावकरांनो काळजी घ्या; तापमान आणखी वाढणार

तरुण भारत लाईव्ह । २० मे २०२३।  उकाड्यामुळे जळगावकर चांगलाच हैराण झाला आहे. शुक्रवारी जळगावमधील कमाल तापमान 43.2 अंशावर गेला. तर किमान तापमान 26.5 अंशावर गेलं होते. आता आजपासून पुढील पाच दिवस तापमान वाढणार आहे.

जळगाव मध्ये गेल्या आढवड्यापासून उष्णतेने कहर केला असून जळगाव शहरात कमाल तापमान 43.2 अंशापर्यंत होते तर किमान तापमान 26.5 अंश सेल्सिअस पर्यंत होते. सकाळी 9 वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा लागत आहे.  दुपारी  तर  नागरिकांना बाहेत पडणे कठीण झालं आहे.

सध्याच्या वाढत्या तापमानामुळे‎ शहरातील वर्द‌ळ मंदावली असून दुपारी‎ बाजारपेठेत अघोषित संचारबंदी‎ असल्यासारखी स्थिती असते.‎ आजपासून 24 मे पर्यंत तापमान 45 अंशापेक्षा अधिक असणार असल्याचा अंदाज असून हे तापमान यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान ठरेल. आवश्यकता नसल्यास दुपारी घरा बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.