तरुण भारत।१४ जानेवारी २०२३। जानेवारी महिन्यात गुलाबी थंडी तसेच सूर्याचे उत्तरायणानंतर दक्षिणायन सुरु होते. यादरम्यान लहानांपासून मोठ्यांपर्यंत आकर्षण असणारे आकाशी उंच भरारी घेणारे पतंग उडविण्याचा आनंद मकरसंक्रांती निम्मिताने दिगुणित करतात. पतंग उडविताना बऱ्याचवेळा पतंग, मांजा, वीजखांब, रोहित्रे, वीज वाहिन्यांमध्ये अडकतात.तो काढण्याच्या नादात अनेकजण वीज वाहिन्यांच्या अगदी जवळ किंवा संपर्कात आल्याने अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे वीज यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखून पतंग उडविण्याचा आनंद घ्यावा ,असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
पतंगप्रेमींनी मोकळ्या मैदानात पतंग उडवावा वीजवाहिन्या खांबावर अडकलेली पतंग व मांजा काढण्याचा शक्यतोवर प्रयत्न्न करू नये.कारण वीजवाहिन्यांच्या एकमेकांवर घर्षणाने शॉटसर्किट होऊन जीवित वा वित्त हानीची शक्यता असते. त्यामुळे मकरसंक्रांतीच्या निम्मिताने पतंग उडविताना योग्य ती खबरदारी घ्या.असे आवाहन महावितरण प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
घराच्या गच्चीवरून,रोहित्रावर चढून वीज तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न टाळावा. वीजवाहिन्यात अडकलेले पतंग काढण्यासाठी दगडाला दोरा बांधून वाहिन्यांवर फेकणे चुकीचे आहे. धातुमिश्रित मांजाचा वापर टाळावा. कारण धातुमिश्रित मांजा वीज यंत्रणेच्या संपर्कात आल्यास त्यात वीज प्रवाहित होऊन विजेचा धक्का लागण्याचा धोका असतो.