---Advertisement---

Yawal Crime News : दुचाकीचा धक्का लागल्याने तरुणावर चाकू हल्ला, चौघांविरोधात गुन्हा दाखल

by team
---Advertisement---

यावल   : तालुक्यातील पाडळसे गावात दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरुन चौघांनी १९  वर्षोय तरुणासोबत वाद घातला. यावेळी तरुणास शिवीगाळ, मारहाण करत एकाने त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना ३  सप्टेंबर रोजी घडली.  याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात शुक्रवारी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

धनराज सुपडू भोई (१९,पाडळसे, ता. यावल ) हा तरुण ३ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता दुचाकीद्वारे घरी जात होता. हॉटेल मराठासमोर दुचाकीचा धक्का लागल्यावरून चौघांशी वाद झाला. धनराज यास आदेश, रोहित, नीलू व मोरे नामक चार तरुणांनी शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी एकाने त्याच्यावर कमरेखाली डाव्या बाजूला चाकूने वार करून दुखापत केली.

याप्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशनला धनराज भोई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.  पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार प्रभाकर चौधरी करीत आहे.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment