जळगाव : परिसरातील लोकांना जुगार खेळण्याची सवय, पत्ता खेळण्याची सवय का लावतो, असा जाब विचारणाऱ्या गृहस्थाला साथीदाराच्या मदतीने बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवार, २७ रोजी दुपारी दोन वाजता सिंधीकॉलनी परिसरात घडली. या प्रकरणी दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अजीत वंसतलाल वलभानी (वय ३८, रा. सिंधी कॉलनी) हे खाजगी नोकरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांनी त्यांच्या घराजवळ संशयिताला बोलविले. जुगार, पत्ता खेळण्याची आपल्या परिसरातील लोकांना तू सवय का लावतो आहे, असा जाब केला. त्यानंतर याठिकाणी यश रामचंद्रानी याचा मित्र यश अग्रवाल हा अजीत वलभानी यांच्या घराजवळ आला. तु यश रामचंद्रानी याला बोलविले का? असा सवाल करत अजीत यांना शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली.
अग्रवाल याने हातातील लोखंडी रॉडने अजीत यांना गंभीर दुखापत केली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम तसेच पोउनि सचिन नवले यांनी धाव घेत प्रकार जाणून घेतला. जखमी अजीत वलभानी यांना शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. उपचार घेत असताना जखमीने दिलेल्या जबाबावरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोहेकॉ ईश्वर लोखंडे हे करीत आहेत