हिंदू धर्मात गाईला विशेष महत्व देण्यात आले आहे . गोवंश कत्तल व गोमांस विक्रीवर बंदी असतानाही वर्धा शहरात एका हॉटेलमधी बिर्याणीत गो-मास आढळून आले आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत हि बाबा उघडकीस आली आहे. दरम्यान पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एकाला अटक करण्यात आली आहे.
वर्धा शहरातील इतवारा चौकातील ‘अल बरकत बिर्याणी सेंटर’ नामक हॉटेलात हि कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शुक्रवार दि. २ १ रोजी हि धाड टाकण्यात आली होती. या कारवाईत हॉटेल मालक कमर अली अमजद अली सय्यद रा. बोरगाव मेघे तसेच फरीद कुरेशी रा. कुरेशी मोहल्ला यांना पोलिसांनी अटक केली आहे. हॉटेल मालकाला या गोमांस संबंधित विचारणा केली असता त्याने फरीद कुरेशी रा. कुरेशी मोहल्ला येथून मांसाचा पुरवठा होत असल्याचे सांगितले. या धाडीत पोलिसांनी पाच किलो गोमांस बिर्याणी जप्त केली आहे. यासोबतच अन्य काही हॉटेलची तपासणी झाली.
पोलीस अधीक्षक पगार पोटे यांनी सांगितले कि, गोपनीय माहितीच्या आधारे वर्धा शहर पोलिस ठाण्याच्या टीमने चार हॉटेलमध्ये अन्नाची पाहणी केली. यात इतवारा बाजार भागातील अल बरकत बिर्याणी या व्यावसायिक प्रतिष्ठानात संशयित मांस आढळून आले. तपासणीअंती हे मांस गो-मांस असल्याचे पुढे आले. त्याचा पुरवठा फरीद कुरेशी याने केल्याची कबुली हॉटेल मालकाने दिली. या प्रकरणी हॉटेल मालक व गो-मांस पुरवठा करणारा अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासनाने गोवंश कत्तल व गोमांस विक्री करणे हा गुन्हा ठरविला आहे. या मांस विक्रीस मनाई आहे. मात्र तरीही गोवंश विक्री होताच आहे. कत्तलखान्याकडे गुरेढोरे घेऊन जाणारे ट्रक अनेकदा पकडण्यात येतात. हे मास स्वस्त दराच्या हॉटेलमध्ये प्रामुख्याने विकल्या जाते.