---Advertisement---

बेन स्टोक्सचा विक्रमी खेळ: कसोटीत शतक आणि ५ विकेट्ससह ऐतिहासिक कामगिरी

---Advertisement---

---Advertisement---

इंग्लडचा कर्णधार बेन स्टोक्स याने मँचेस्टरमध्ये सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात शानदार शतक झळकावले. त्याने ही कामगिरी दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कसोटी स्वरूपात केली आहे. त्याच्या खेळीमुळे इंग्लंडची मजबूत स्थितीही मजबूत झाली.

बेन स्टोक्सने आपले शतक पूर्ण करण्यासाठी १६४ चेंडूंचा सामना केला. या त्याच्या शतकात ९ चौकारांचा समावेश आहे. त्याने २ वर्षांनी कसोटीत शतक ठोकण्याचा पराक्रम केला. यापूर्वी, त्याने जुलै २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १५५ धावांची शानदार खेळी खेळली होती. इंग्लंडला पहिल्या डावात ६०० धावांचा टप्पा ओलांडण्यास मदत करण्यासाठी स्टोक्सचे हे शतक महत्त्वाचे ठरले. त्याच्या खेळीमुळे संघाला मोठी आघाडी मिळाली.

या सामन्याच्या पहिल्या डावात बेन स्टोक्सने ५ विकेट्स घेतल्या होत्या. यासह, तो कसोटी सामन्यात ५ विकेट्स आणि शतक करणारा इंग्लंडचा चौथा खेळाडू ठरला आहे. तसेच कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ४२ वर्षांनंतर, एका कर्णधाराने कसोटी सामन्यात शतक झळकावले आहे आणि ५ विकेट घेतल्या आहेत. याआधी इम्रान खानने १९८३ मध्ये हा पराक्रम केला होता. विशेष म्हणजे इम्रान खानने भारतीय संघाविरुद्धही हा पराक्रम केला होता.

या खेळीसह बेन स्टोक्सने इंग्लंड क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरात लिहिले आहे. यासोबतच तो एकाच कसोटी सामन्यात शतक आणि ५ विकेट्स घेणारा इंग्लंडचा पहिला कर्णधार बनला आहे. त्याच्या आधी कोणताही इंग्लिश कर्णधार हा पराक्रम करू शकला नाही. त्याच वेळी, बेन स्टोक्सच्या कसोटी कारकिर्दीतील हे १४ वे शतक आहे. या खेळीदरम्यान त्याने कसोटीत ७००० धावाही पूर्ण केल्या. कसोटीत ७००० धावा आणि २०० विकेट्स घेणारा तो जगातील फक्त तिसरा खेळाडू ठरला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment