---Advertisement---
---Advertisement---
इस्रायलने गाझापट्टीतील दाट लोकवस्तीच्या तीन शहरांत कारवाई थांबविण्याचा निर्णय घेतला. उपासमारीच्या संकटामुळे हल्ले थांबविण्यात आल्याची माहिती सोमवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिली. त्याचवेळी त्यांनी हमासने युद्धबंदी करार नाकारल्यास संपूर्ण गाझा ताब्यात घेणार असल्याचा इशारा दिला.
नेतान्याहू यांनी जनतेला केलेल्या संबोधनात म्हटले की, आमच्या लष्कराने गाझातील तीन शहरांत हल्ले थांबविण्याचा निर्णय घेतला तेथील आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्या, यासाठी या भागांत कारवाई केली – जाणार नाही. हमासने पुन्हा युद्धबंदी आणि ओलिसांच्या सुटकेच्या कराराचा प्रयत्न नाकारला, तर इस्रायल गाझापट्टीचा ताबा मिळवेल.
कारवाई थांबविलेल्या भागांत मदत केंद्र वाढविण्यात येईल आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडून पाठविण्यात येणारी मदत त्या – ठिकाणी पोहोचविण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान, नेतान्याहू यांनी काही मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मांडला, याला मंजुरी मिळाल्यानंतर त्यांनी संबोधनात गाझातील परिस्थितीवर भाष्य केले.
मुलांसाठी अन्न केंद्रे निर्माण करणार
ट्रम्प यांनी गाझातील बिघडत्या मानवतावादी परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आणि सांगितले की मुलांना त्वरित अन्न आणि सुरक्षा मिळायला हवी. आंतरराष्ट्रीय सहकायनि गाझामध्ये मुलांसाठी अन्न केंद्रे स्थापन केली जातील. इतर देशांनी मदत करण्यासाठी पुढे यावे. या भागात उपासमारीचे मोठे संकट असून यामुळे मुलांचे मोठे हाल होत आहे आणि यासाठी हमास जबाबदार असल्याचे ते म्हणाले.
अमेरिकेकडून ६० दशलक्ष डॉलर्सची मदत : ट्रम्प
पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या समाज माध्यम खात्यावर लिहिले की, गाझाच्या तीन शहरात हल्ले थांबविल्याने तेथे शांतता प्रस्थापित करणे शक्य होणार आहे. अमेरिका गाझात अन्न आणि पाण्यासाठी ६० दशलक्ष डॉलर्सची मदत देणार आहे. यापूर्वर्वीदेखील आम्ही गाझात मदत पाठवली. हमासने त्यांच्या ताब्यात असलेल्या २० ओलिसांची तातडीने सुटका करावी. त्यांनी युद्धबंदी करार मोडल्यास त्यांचे अस्तित्व राहणार नाही.