सावधान! सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीसाठी व्हॉट्सॲपचा सर्रास वापर

#image_title

नवी दिल्ली : सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन पद्धती अवलंबत आहेत. गुन्हेगार आता लोकांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून फसवण्याचा प्रयत्न करीत आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार, २०२४ च्या पहिल्या तीन महिन्यांत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सायबर फसवणूकीच्या एकूण ४३,७९७ तक्रारी प्राप्त झाल्या, त्यानंतर टेलिग्रामविरूद्ध २२,६८० आणि इन्टाग्रामविरूद्ध १९,८०० तक्रारी आल्या.

सायबर फसवणूक करणारे हे गुन्हे सुरू करण्यासाठी गुगल सेवा प्लॅटफॉर्म वापरत आहेत. यात गुगल ॲड प्लॅटफॉर्मचा अधिक वापर केला जात आहे. हा घोटाळा पिग बुचरिंग स्कॅम किंवा गुंतवणूक घोटाळा म्हणून ओळखला जातो. हे जगभरात व्यापक आहेत आणि त्यात मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंग आणि अगदी सायबर गुलामगिरीचा समावेश आहे. बेरोजगार युवक, गृहिणी, विद्यार्थी आणि गरजू लोकांना सायबर गुन्हेगारांनी टार्गेट केले असून, त्यात अडकून ते मोठ्या प्रमाणात पैसे गमावत आहेत. प्रायोजित फेसबुक जाहिराती भारतात बेकायदेशीर कर्ज देणारी ॲप्स लाँच करण्यासाठी संघटित सायबर गुन्हेगारांकडून मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. आर्थिक फसवणुकीचा तत्काळ अहवाल देण्यासाठी आणि फसवणूक करणाऱ्यांकडून निधीचा गैरवापर रोखण्यासाठी सिटीजन फायनेन्शियल साइबर फ्रॉड रिपोर्टिंग ॲण्ड मॅनेजमेंट सिस्टम सुरू करण्यात आली आहे.