काळजी घ्या! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा या राज्यासह महाराष्ट्राला सर्वाधिक धोका

corona : कोरोना काळ कुणाला काही नवीन सांगायची गरज नाही मात्र मात्र आता पुन्हा देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने देशभरात मोठा हाहाकार माजला आहे. कोरोनाचा XBB.1.16 व्हेरिएंट कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांसाठी जबाबदार असल्याचे मानले जाते. INSACOGने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या XBB.1.16 व्हेरिएंची एकूण 76 प्रकरणे भारतात आढळून आली आहेत. या व्हेरिएंची सर्वाधिक प्रकरणे कर्नाटकात आढळून आली आहे.

या व्हेरिएंची 30 प्रकरणे कर्नाटकात, 29 महाराष्ट्रात, 7 पुडुचेरीमध्ये, 5 दिल्लीत, 2 तेलंगणात, 1 गुजरातमध्ये, 1 हिमाचल प्रदेशात आणि 1 ओडिशामध्ये आढळली आहेत. INSACOGच्या डेटानुसार, XBB.1.16 व्हेरिएंटचा पहिला रुग्ण जानेवारीमध्ये आढळून आला होता, त्यानंतर फेब्रुवारीमध्ये एकूण 59 रुग्ण आढळून आढळले होते. मार्चमध्ये आतापर्यंत XBB.1.16चे एकूण 15 प्रकरणे आढळून आली आहेत.

दरम्यान, भारतात शनिवारी तब्ब्ल 126 दिवसांनंतर एका दिवसात कोरोनाचे 800 हून अधिक रुग्ण आढळेल आहेत. शनिवारी सकाळी आठ वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोविड -१९ चे (Corona) 843 नवीन रुग्ण आढळल्यानंतर एकूण संक्रमित लोकांची संख्या 4,46,94,349 झाली आहे.

देशातील कोरोनाची स्थिती

गेल्या 24 तासांत झारखंड आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे, तर केरळमध्ये दोन रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मृतांची एकूण संख्या 5,30,799 इतकी झाली आहे. देशात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 5,839 आहे, जी एकूण संक्रमित संख्येच्या 0.01 टक्के आहे. त्याच वेळी, संसर्गातून बरे झालेल्यांचा दर 98.80 टक्के आहे. भारतात कोविड-19 चा पराभव करणाऱ्यांची एकूण संख्या 4,41,58,161 झाली आहे. त्याच वेळी, मृत्यू दर 1.19 टक्के असल्याचा अंदाज आहे.