तरुण भारत लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२२ । बनावट जाहिरातीच्या माध्यमातून धरणगावच्या वृद्धाची एक लाख 19 हजार रुपयाची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात दोन अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
किशोर मंगेश पाटील (वय 60, रा. हेमबिंदू नगरात. धरणगाव, ) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. पाटील यांना दि. 7 ऑगस्ट 22 रोजी मो.नं.9433273072, 9748067069 यांनी फेसबुकवर पतंजली योगपीठ ट्रस्ट युनिट-2, हरीद्वार, उत्तराखंड या संस्थेला योगासन आणी प्राणायाम सात दिवसांच्या प्रशिक्षणाबाबत टाकलेली जाहिरात दिसली.
या जाहिरातीत प्रशिक्षणासाठी पंतजली योगपीठ ट्रस्ट युनिट- 2 खात्याचा क्रं. 1905190190059665 टाकलेला होता. किशोर पाटील हे प्रशिक्षण करण्यास इच्छुक असल्यामुळे त्यांनी ‘फोन पे’द्वारे टप्याटप्याने एकूण एक लाख 19 हजार रुपये 7 ऑगस्ट रोजी दुपारी 1.59 वाजता तसेच गुरुवार, 8 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 2.27 वाजेच्या दरम्यान वेळोवेळी टाकले. परंतु याबाबत संपर्क साधल्यावर पैसे परत करण्यास टाळाटाळ व्हायला लागली.
दरम्यान, फसवणुू झाल्याचे लक्षात आल्यावर किशोर पाटील यांनी मो.नं. 9433273072, 9748067069 धारकाविरुध्द कायदेशीर तक्रार दिल्यानंतर धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक अमोल गुंजाळ करीत आहेत.