संतोष देशमुख हत्या प्रकरणात धंनजय मुंडे यांचा काहीही संबंध नाही तसेच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांची मानसिकता तपासायला पाहिजे आणि भगवानगड हा धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कम उभा आहे. असे सांगणाऱ्या भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी आत्ता त्यांच्या वक्तव्यवरुन यू टर्न घेतल्याचं पाहायला मिळालं आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणी पहिल्या दिवशी मला पूर्वकल्पना नव्हती .धनंजय देशमुख यांच्याशी भेट घेतल्यानंतर माझे भावना बदलली .भगवानगड देशमुख कुटुंबाच्या मागे आहे .असं आता नामदेव शास्त्री म्हणाले आहेत .
संतोष देशमुख हत्याप्रकरणी मारहाणीचे फोटो समोर आल्यानंतर भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “आधी मला घटनेची तीव्रता माहीत नव्हती. पहिल्या दिवशी जे बोललो ते अजाणतेपणामुळे झालं. संतोष देशमुख कुटुंब माझ्याकडे आलं, तेव्हा त्यांनी मला जाण करून दिली किती भयंकर क्रौर्य आहे” असं भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री म्हणाले. “तेव्हा मला त्याची जाणीव झाली. माझं अंतकरण दुखावलं, हेलावलं. मी न्यायालयाला विनंती करतो, त्यांना फास्ट ट्रॅक वरती घेऊन शिक्षा मिळावी. भगवानगड सदैव देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे” असं महंत नामदेव शास्त्री म्हणाले.
जानेवारी महिन्याच्या अखेरीस धनंजय मुंडे भगवान गडावर गेले होते. त्यावेळी धनंजय मुंडे मंत्री होते. त्यावेळी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना सर्वच प्रकरणात पाठिंबा दिला होता. इतकेच नाही तर भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे असल्याचा थेट संदेश दिला होता. यानंतर महंत नामदेव शास्त्री यांच्यावर चहूबाजूंनी टीका सुरु झाली. त्यानंतर स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी भगवान गडावर जाऊन महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. आपली बाजू सांगितली होती.