भगवान श्री परशुराम शस्त्र,शास्त्र याचे मार्गदर्शक : प्रशांत परिचारक

जळगाव  : भगवान श्री परशुराम हे शस्त्र आणि शास्त्र या दोन्हींचा केव्हा आणि कसा उपयोग करावा याचे उत्तम मार्गदर्शक असल्याचे सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार व श्री पांडुरंग सहकारी  साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांनी प्रतिपादन केले.  अजय डोहोळे संपादित ब्रह्मदंड मासिकाच्या  भगवान श्री परशुराम जन्मोत्सव विशेषांकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.
गेल्या दोन दशकात सामाजिक पत्रकारिता करीत २५० पेक्षा जास्त अंक प्रकाशित केले आहे. त्यात दरवर्षी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विशेषांकाचे प्रकाशन करून हजारो समाज बांधवांना उत्सव स्थळी विनामूल्य वितरण करण्यात येते असे अजय डोहोळे यांनी सांगितले.  या अंकात आजपर्यंत भगवान श्री परशुराम यांचे चरित्र, कथा, मंदिरे, पुस्तके, स्तोत्र, मंत्र, आरत्या,फोटो आधी विविध माहिती मराठी व हिंदी भाषेत  प्रकाशित करण्यात आली आहे.आभार अनघा डोहोळे यांनी मानले.