Pachora News : पाचोऱ्यात भारत माता व संविधान पूजन सोहळा उत्साहात

विजय बाविस्कर
पाचोरा :
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने २५ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर भारत माता व संविधान पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पाचोऱ्यातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात वैशाली सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी भारत मातेचे व संविधानाचे पूजन करून परिसरात भारत मातेच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले.

या कार्यक्रमात उद्धव मराठे, अरुण पाटील, शरद पाटील, अभय पाटील, योजना ताई पाटील, रसूल चाचा, सिकंदर तडवी, राजेंद्र काळे, एकनाथ महाराज, मनोहर चौधरी, पप्पू दादा, शशिकांत पाटील, निखिल भुसारे, गजू पाटील, चंदू पाटील, प्रमोद पाटील, नितीन महाजन, गोपाल परदेशी, मनोज चौधरी, सुनील शिंदे, खरे साहेब, अरुण तांबे, पप्पू जाधव, गजानन सावंत, डी. डी. पाटील, गुलाब नाना, हारून शेख, राहुल पाटील, प्रविण पाटील, अमोल महाजन, विलास पाटील यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

कार्यक्रमात उपस्थितांनी संविधानाचे महत्व आणि भारत मातेच्या गौरवाचा संदेश देत राष्ट्रीय एकात्मतेच्या भावना जागविल्या. पूजनानंतर उपस्थितांनी संविधानाचे पालन आणि समाजसेवेसाठी सक्रिय राहण्याचा संकल्प केला.