भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 133 वी जयंती साजरी

ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला, दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला, कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला, ज्यांनी संविधानरुपी समतेचा अधिकार दिला. बाबासाहेबांनी दलित वर्गाला समाजात समानता मिळवून देण्याबरोबरच त्यांनी समाजसुधारणेसाठीही अनेक कामे केली. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन संघर्षांनी भरलेले होते. पण, ते अवघ्या जगासाठी एक मूर्तिमंत उदाहरण बनले आहेत, ज्यातून सर्वांनाच प्रेरणा मिळते ” भारतरत्न डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची जयंती दरवर्षी 14 एप्रिल रोजी देशभरात साजरी केली जाते. यंदा संपूर्ण देश त्यांची 133 वी जयंती साजरी करत आहे. भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय जी. एम. फाउंडेशन येथे पुष्पहार घालून करण्यात आला. यावेळी लोकसभेचे उमेदवार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, जळगाव लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ. राधेशाम चौधरी, माजी महापौर सीमा भोळे, सरचिटणीस अरविंद देशमुख, विधानसभा निवडणुक प्रमुख विशाल त्रिपाठी, महेश जोशी, सुनील खडके, राजेंद्र मराठे, उदय भालेराव, मुकुंद मेटकर, युवा मोर्चा अध्यक्ष महेश पाटील, नीला चौधरी, दीपमाला काळे, सुचिता हाडा, गायत्री राणे, नंदिनी दर्जी, ज्योती निंभोरे, डॉ. केतकी पाटील, चित्रा मालपाणी, राजू मराठे, राहुल पाटील, मंडल अध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी प्रसिध्दी प्रमुख मुविकोराज कोल्हे उपस्थित होते.