Bhusawal Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates :भुसावळ विधानसभेत पहिल्या फेरीत आमदार संजय सावकारे आघाडीवर

Bhusawal Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates :  भुसावळातील महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांना पहिल्या फेरीतच तीन हजार 789 मतांचा लीड मिळाला असून त्यांनी पहिल्या फेरीतच आघाडी घेतल्याने कार्यकर्ते सुखावले आहे. तहसील कार्यालयाच्या गोदामात शनिवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. टपाली मतांची आधी मोजणी करण्यात आली असून अद्यापपर्यंत प्रशासनाकडून पहिल्या फेरीची उद्घोषणा अधिकृतरीत्या झालेली नाही.

अशी आहेत पहिल्या फेरीतील मते
आमदार संजय सावकारे (भाजपा) 5546, डॉ.राजेश मानवतकर (काँग्रेस) 1757, स्वाती जंगले (अपक्ष) 581, जगन सोनवणे (वंचित) 147.

दुसऱ्या फेरी अखेर भाजपचे आमदार राजू मामा भोळे यांना 16268 मतदान तर ठाकरे गटाच्या जयश्री महाजन यांना 7116 मतदान आमदार राजू मामा भोळे 9152 मतांनी आघाडीवर

महाराष्ट्रातील २८८ विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. दरम्यान, निकालांवर अवलंबून असलेल्या या सर्व तयारीने महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणखी चुरशीची झाली आहे.

सायंकाळपर्यंत महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा चेहरा स्पष्ट होईल. कोणाला बहुमत मिळेल, कोणते गट एकत्र येतील, आणि सत्ता स्थापनेसाठी कोणती रणनीती अवलंबली जाईल, याबाबत राज्यातील जनतेत कमालीची उत्सुकता आहे.