भुसावळ बांद्रा खान्देश एक्सप्रेस लवकरच दररोज धावणार : रेल्वेमंत्री ना. रावसाहेब दानवे

शिरपूर : नरडाणा येथे गेल्या 25 वर्षांपासून परिसरातील व शिरपूर तालुक्यासह धुळे जिल्ह्यातील नागरिकांची नरडाणा रेल्वे स्टेशनवर मेल एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा तसेच भुसावळ बांद्रा खान्देश एक्सप्रेस रेल्वे गाडी दररोज व्हावी, अशी मागणी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी रेल्वेमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे 12 रोजी जालना येथे भेट घेऊन निवेदन देवून मागणी केली.

भुसावळ बांद्रा खान्देश एक्सप्रेस ही रेल्वे दररोज करण्यात यावी व भुसावळहून सायंकाळी सहाऐवजी रात्री 8 वाजता व बांद्राहून रात्री 12.20 ऐवजी रात्री 10 वाजता सोडावी, सुरत अमरावती सुपर फास्ट रेल्वेगाडी दररोज करण्यात येऊन नरडाणा येथे या गाडीला थांबा मिळावा, बोराणी अहमदाबाद एक्सप्रेस गाडीला नरडाणा येथे थांबा मिळावा, अशा मागणीचे निवेदन रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांना धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी जालना येथे दिले. यावेळी त्यांच्यासोबत नरडाणा परिसरातील रेल्वे संघर्ष समितीचे सदस्य रवींद्र वाघ वारुड, कुणाल जाधव शिरपूर आदी उपस्थित होते. रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी आश्वासन दिले की, लवकरच भुसावळ बांद्रा खान्देश एक्सप्रेस ही रेल्वे दररोज करण्यात येणार असे सांगितले.