Bhusawal Crime News : बॅटरी चोरटे सीसीटीव्हीच्या साहाय्याने पोलिसांच्या अटकेत

भुसावळ : शहरातील कंडारी येथून बॅटऱ्या चोरीस गेल्या होत्या. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन्ही संशयित आरोपी दिसून आले. त्या दोघांना अटक करण्यात आली.

संशयित आरोपी मोहम्मद आसिफ (२४, रा. आगवाली चाळ, भुसावळ) व सिकंदर तडवी (२०, रा. कवाडेनगर, भुसावळ) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून बॅटरी व वापरण्यात आलेले वाहन जप्त करण्यात आले आहे. नीलेश मुरलीधर मोरे (रा. कंडारी) यांच्या घराजवळून चोरट्यांनी दि. ५ सप्टेंबर रोजी बॅटरी चोरली होती. यासंदर्भात दि. १३ रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. चोरीचा प्रकार उघड झाल्यावर घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी भेट देऊन पाहणी केली होती.

घटना घडल्यापासून पोलिसांनी तपासचक्रे फिरवली. या तपासादरम्यान चोरटे सीसीटीव्ही कैद झाल्याचे समोर आले. या सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने संशयित चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे व शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक इकबाल सय्यद, पोहेका संदीप पालवे, पोना जाकीर मंसुरी, अब्दुल रज्जाक, पोहेका राहुल भोई यांच्या पथकाने आरोपीस वाहन व बॅटरी ताब्यात घेतले.