भुसावळ : शहरातील नॉर्थ कॉलनी भागातील ३६ वर्षीय तरुणाला गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस व चारचाकी वाहनासह जळगाव गुन्हे शाखेने अटक केली आहे. सुमित मनोहर पवार (भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
पाच हजार रुपये किमतीचा कट्टा, १०० रुपये किमतीचे एक काडतूस व सहा लाखांची कार मिळून एकूण सहा लाख पाच हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे हवालदार कमलाकर बागुल यांना संशयित पवार याच्याकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी वरिष्ठांना कल्पना दिली व ९ रोजी सापळा रचून संशयिताला सुभेदार रामजी हायस्कूल परिसरातून अटक करण्यात आली.
आरोपीच्या ताब्यातील स्कॉर्पिओ (एम.एच.१९ सी. वाय. ३९७८) जप्त करण्यात आली असून संशयीताकडील गावठी कट्टा व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, हवालदार कमलाकर भालचंद्र बागुल, हवालदार गोपाल पोपट गव्हाळे, हवालदार संदीप चव्हाण, हवालदार संघपाल राजाराम तायडे, नाईक प्रवीण पुंडलिक भालेराव, कॉन्स्टेबल सचिन रमेश पोळ आदींनी ही कारवाई केली.