---Advertisement---
Bhusawal Crime News: शहरातील कपिलेश्वर मंदिर जवळ, चमेली नगर भागातील राहत्या घराचे दरवाजाचा कडीकोयंडा कापून घरफोडी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घरफोडीत चोरट्याने घरातील लोखंडी कपाटातून सोने – चांदीचे दागिन्यांसह रोकड लांबविली आहे. दि. ३ ते ४ ऑक्टोबरच्या रात्रीच्या दरम्यान ही घटना घडली.
याबाबात माहिती अशी की, फिर्यादी सचिन अनिल चौधरी हे परिवारासह शहरातील साने गुरुजी चौकात देवी विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी घराला कुलूप लावून गेले होते. दरम्यान घर बंद असल्याची संधी साधत कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरफोडी करत ऐवज लंपास केला. चौधरी हे मिरवणूक पाहून घरी परतले असता घराचे पोर्च जवळ काचा फुटलेल्या दिसल्या. त्यानंतर त्यांनी घराचा दरवाजा उघडला असता दरवाजांचा कडीकोयंडा देखील कापलेलला दिसला. त्यांनी घरात पाहिले असता दोघे लोखंडी कपात उघडे दिसले.
इतका ऐवज लंपास चोरट्याने घरफोडी करत कपाटातील १६ हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत, १२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे कानातले, १२ हजार रुपये किंमतीची गळ्यातील सोनसाखळी, ८ हजार रुपयांचे सोन्याचे कानातील, ५ हजार रुपये कींमतीचे ब्रासलट, चांदीचे पैंजन असा एकूण ५ लाख ३२ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेले. या प्रकरणी सचिन अनिल चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.गुन्ह्याचा अधिक तपास सउपनिरी मंगेश जाधव करीत आहे.