Bhusawal News : भुसावळात विकासकामांमध्ये खोडा घालणाऱ्यांची कमी नाहीं : आमदार संजय सावकारे

भुसावळ : कुठलाही गाजावाजा करून विकासकामे करण्याची आपल्याला सवय नाही, मात्र विकासकामे करताना खोडा घालणाऱ्यांची शहरात कमी नाही याचे उदाहरण शहरातील वसंत टॉकीजसमोरील हे संकुल आहे, अशी टीका आमदार संजय सावकारे यांनी कुणाचेही नाव न घेता शहरात केली. शुक्रवारी त्यांच्याहस्ते सर्वे क्रम कि ४३०० मधील संकुलाचे भूमिपूजन झाले.

आमदार म्हणाले की, शहरातील नगरसेवकांनी अंतर्गत रस्त्यांची कामे करण्याबाबत आग्रह धरल्याने जवळपास सर्वच रस्त्यांची कामे झाली मात्र प्रमुख वर्दळीच्या रस्त्यांची कामे होवू शकली नाही मात्र आगामी सहा महिन्यात प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण होवून समस्या सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पावसामुळे कामांना व्यत्यय

आमदार सावकारे म्हणाले की, जामनेर रस्त्याची दुरुस्ती करण्यात आल्यानंतर आज प्रत्यक्षात डांबरीकरण सुरू होणार होते मात्र गुरुवारी मुसळधार पावसामुळे हे काम. लांबणीवर पडले आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांचे आधी काम करा, असा आग्रह नगरसेवकांनी धरल्याने प्रमुख वर्दळीच्या रस्त्यांना उशिराने सुरुवात झाली मात्र या रस्त्यांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर असून आगामी काही महिन्यात भुसावळ- जामनेर, महात्मा गांधी पुतळा ते जळगाव रोड, बसस्थानक ते लोखंडी पूल आदी रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्णत्वास येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काली मातेला भेट दिलेल्या मुकुटाची चोरी

व्यापाऱ्यांवर अन्याय झाल्यास आंदोलन युवराज लोणारी

माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी म्हणाले की, १४ वर्षानंतर या जागेचा वनवास संपत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलाला जशी नाट लागली तसा प्रकार या संकुलाबाबत होवू नये. दुकानदारांवर अन्याय झाल्यास प्रसंगी आंदोलन छेडू या संकुलाला महाराणा प्रताप यांचे नाव द्यावे व पालिकेने त्याबाबत विचार करावा, असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन संदीप सुरवाडे यांनी करीत आभार मानले.

आडमुठ्या धोरणामुळे एसी मार्केट रखडले : उमेश नेमाडे

भुसावळ शहरात मोक्याच्या जागेवर एसी मार्केट होणार होते मात्र ते आडमुठ्या धोरणामुळे होवू शकले नाही, असे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे म्हणाले. शहरातील प्रलंबित विकासकामे केवळ आमदार संजय सावकारे यांच्यामुळे होत असल्याचे सांगून ते म्हणाले की, व्यापारी संकुल उभे राहिल्यानंतर बेरोजगार तरुणांना व्यापार करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. हुसनोद्दीन पेंटर यांनी त्या काळी घेतलेली मेहनत आता फळाली आहे.

विकासकामात काड्या करणारे अधिक !

आमदार म्हणाले की, कुठलेही काम करण्याआधी गाजा-वाजा करण्याची आपल्याला सवय नाही मात्र शहरात विकासकामे करताना काड्या करणाऱ्यांची कमी नाही व त्याचे उदाहरण हे संकुल आहे. या जागेवर आधी शाळा होती व त्या शाळेची मुख्याध्यापिका माझी आई असल्याने आपले नेहमी येथे येणे- जाणे होते. या जागेवर एसी मार्केट होणार होते मात्र ते झाले नाही. तत्कालीन मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी या जागेवर संकुलाची कल्पना मांडत त्यासाठी प्रस्ताव तयार केला व त्यास मंजुरी मिळाली. या जागेवरच नाही तर शहरातील जुन्या नगरपालिकेच्या तसेच नाहाटा महाविद्यालय परिसरात भव्य व्यापारी संकुलाची उभारणी आगामी काळात करण्यात येईल. शहरात बॅण्डेड कंपनीच्या शॉप नाहीत व त्यांना लागत असलेली प्रशस्त जागा पाहता नियोजित संकुलात प्रशस्त गाळे काढावेत, असा सत्ता त्यांनी पालिका प्रशासनाला दिला. नगरपालिका संकुलातील गाळे मिळण्यासाठी कुणीही शिफारसीसाठी येवू नये, असे त्यांनी सांगत व्यापाऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यावी.

दोन मजली संकुल : १३८ गाळे

सिटी सर्वे क्रमांक ४३०० मध्ये केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेंतर्गत बिनव्याज कर्जातून संकुलाची उभारणी केली जात आहे. पुण्यातील विलास पाटील असोसिएटला हे काम मिळाले असून साधारण दुमजली संकुलात १३८ गाळे असतील, त्यात बेसमेंटला पार्किंग व तळमजल्यावर ६८ व पहिल्या मजल्यावर ७८ असे १३८ गाळे असतील. साधारण दिड वर्षात संकुलाची उभारणी होईल.

शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवरील अतिक्रमण चिंतेची बाब आमदार संजय सावकारे

शहरातील वर्दळीच्या सर्वच रस्त्यांवर अतिक्रमण वाढल्याची बाब चिंतनीय असल्याचे आमदार म्हणाले. व्यावसायिकांनी शहर आपले आहे व स्वच्छ राहिले पाहिजे यासाठी वर्दळीच्या रस्त्यावर अतिक्रमण करणे टाळावे, असेही आमदार म्हणाले. शहरातील अमृत योजनेव्या कामाला गती आली असून लवकरच उर्वरीत कामे होतील, असे सांगून त्यांनी शहरासाठी ४०० कोटींची भूमिगत गटार योजना मंजूर असल्याचे ते म्हणाले. नागरिकांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा व पाण्याचा अपव्यय होणाऱ्या भागात पालिकेने तोट्या लावाव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या.