---Advertisement---
Bhusawal News: सिंधी समाजाचे ईष्ट देव झूलेलाल भगवान यांच्या विरोधात जोहार छत्तीसगढ पार्टी, बिलासपूरचे कार्यकर्ते अमित बघेल यांनी वादग्रस्तक वक्तव्य केले आहे. हे वक्तव्य सिंधी समाजाच्या भावना दुखवणारे असून अमित बघेल याच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन सिंधी समाज बांधवांतर्फे भुसावळ उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, या वक्तव्यामुळे सिंधी समाजाच्या धार्मिक भावना अत्यंत दुखावल्या गेल्या असून समाजात असंतोष व धार्मिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने चौकशी करून संबंधित व्यक्तीवर भारतीय दंड संहिता कलम १५३(अ), २९५(अ) अन्वये तात्काळ गुन्हा दाखल करून अमित बघेल यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. निवेदन देतेवेळी अशोक नागराणी, निक्की बतरा, पिंटू ठाकुर, अजय नागराणी यांचेसह समाज बांधव उपस्थित होते.









