---Advertisement---

Bhusawal News : भुसावळात गावठी कट्ट्यासह एकास अटक, वीटभट्टी जवळ बाजारपेठ पोलिसांची कारवाई

---Advertisement---

Bhusawal News : बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे एका तरुणाकडून दोन जिवंत काडतुसे व पिस्टल जप्त केले आहे. ही कारवाई शहरातील आलिशान वॉटर पार्कच्या मागे असलेल्या वीट भट्ट्यांजवळ करण्यात आली. नीलेश अनंत पारधे (२१, रा. छायादेवी राकानगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई

शहरातील आलिशान वॉटर पार्क परिसरामधील वीटभट्टीजवळ संशयित आरोपी नीलेश अनंत पारधे हा पिस्टल बाळगून असल्याची माहिती भुसावळ बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई करत संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १५ हजार रुपये किमतीचा कट्टा व दोन हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे जप्त केली. पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी नीलेश पारधेच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे, विजय नेरकर, महेश चौधरी, अमर आढाळे, राहुल वानखेडे व हर्षल महाजन आर्दीच्या पथकाने केली. तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे करीत आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment