Bhusawal News:  भुसावळातून पाच वर्षीय मुलीचे अपहरण करणारा पोलिसांच्या जाळ्यात, चिमुकली सुखरूप

---Advertisement---

 

Bhusawal News:  भुसावळ शहरातील बसस्टॅंड परिसरातून २२ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी एका पाच वर्षीय मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले होते. या प्रकरणी दाखल गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश मिळाले असून अपहरण करणाऱ्या आरोपिला चिमुकतीसह ताब्यात घेण्यात आले आहे. अपहरण करणाऱ्या आरोपिला पोलिसांनी अटक केली असून ५ वर्षिय चिमुकलीला सुखरुप तिच्या आईच्या स्वाधिन करण्यात आले आहे.

 याबाबात माहिती अशी की, भुसावळ शहरातील बसस्टँड परिसरातून पाच वर्षिय चिमुकली संतोषी उर्फ राधा हिचे कोणीतरी अज्ञात चोरट्याने अपहरण करत तिला पळवून नेले होते. या प्रकरणी मुलीची आई काजल मुन्ना ठाकूर हिने फिर्याद दिल्याने अज्ञाताविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी  तपासादरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्‍लेषण आणि गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. तपासात गोरेलाल भगवानसिंग कछवे उर्फ भिलाला हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने उजनी देवस्थान, ता. बोदवड येथून गोरेलाल भगवानसिंग कछवे उर्फ भिलाला यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने अपहरण केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून पिडीत मुलगी सुखरूप तिच्या आईकडे सोपवली आहे.

या यशस्वी कारवाईत पोलीस अधीक्षक जळगाव महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

या पथकात सहाय्यक पोलीस निरिक्षक नितीन पाटील, पोलीस उपनिरिक्षक मंगेश जाधव, पोलिस विजय नेरकर, कांतीलाल केदारे, रवींद्र भावसार, पोलीस शिपाई योगेश माळी, प्रशांत सोनार, भुषण चौधरी, अमर अढाळे, जावेद शहा, हर्षल महाजन, जिवन कापडे, योगेश महाजन, सचिन चौधरी, महेंद्रसिंग पाटील, मोहसिन शेख,  स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरिक्षक रवींद्र नरवाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल उमाकांत पाटील, अक्रम शेख, गोपाल गव्हाळे, पोलीस नाईक विकास सातदिवे, पोलीस शिपाई प्रशांत परदेशी,  राहुल वानखेडे, राहुल रगडे, उदय कापडणे, रविंद्र चौधरी, किशोर पाटील, नेत्रम कॅमेरा विभागाचे पोलीस शिपाई मुबारक देशमुख, पंकज राठोड, प्रणय पवार यांचा सहभाग होता. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल रमण सुरळकर हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---