Bhusawal News : भुसावळात छत्रपती शाहू महाराजांना 151व्या जयंतीनिमित्त अभिवादन

---Advertisement---

 

Bhusawal News : छत्रपती शाहू महाराजांच्या 151व्या जयंती निमित्त अँटी करप्शन मानव अधिकार सर्व शक्ती सेना राज्य अध्यक्ष तथा भाजपा अनुजाती मोर्चा राज्य सचिव प्रा. संजय मोरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भुसावळचे माजी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे हे होते, विशेष प्रमुख अतिथी प्रा. संजय मोरे, प्रा. संजय मोरे यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

त्या प्रसंगी प्रा. संजय मोरे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि, छत्रपती शाहू महाराज यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्ये मौल्यवान गुण पहिला कि, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परदेशातून इंग्रजाच्या कायद्याचे शिक्षण पुर्ण करून आल्यावर तें त्याच्या लेखणीच्या आधारे योग्य लढा देतील.म्हणुन त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रदेशात शिक्षणा साठी शिष्यवृत्ती दिली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाहु महाराज यांच्याकडून मिळालेल्या शिष्यवृतीचा पुर्ण उपयोग घेत विविध पदव्या संपादन करून घटना कायदे व विश्वाचा अभ्यास करत जगातील सर्वात मोठे भारतीय संविधान सहकार्याच्या सहभागाने भारतीय संविधान लिहुन भारत भुमिस समांनतेचा अधिकार देऊन स्वातःत्र समता बंधुत्व प्रस्थापित करण्यास अनमोल असे विचार देशासमोर मांडले.

छत्रपतीशाहू महाराज हे दिन दलित बहुजनाचे कैवारी होते.असे आपले मनोगत व्यक्त करतांना सांगीतले.या कार्यक्रमाला इंजि. पुरुषोत्तम ठाकुर, डॉ. संदीप गाढे, डॉ. महेंद्र सुरवाडे, प्रा. अनिल सपकाळे, मयुर कोळी, जगदीश बैरागी, प्रा. दिपक महाजन दिलीप खर्चे निलेश पाटील सुनील पाटील विजय सुरवाडे शेखर देशमुख प्रा. सुनिल तायडे कर्यकर्माचे सूत्रसंचालन डॉ. धनराज बावस्कर यांनी केलेतर आभार दिगंबर चौधरी यांनी मानले आपला विश्वासु – प्रा. संजय मोरे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---