सुपोषित जळगाव अभियानांतर्गत सायकल रॅलीचे आयोजन

---Advertisement---

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून यंग इंडिया फिट इंडिया या अभियानांतर्गत जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचे महत्वकांक्षी कार्यक्रम सुपोषित जळगाव अभियान ह्या कार्यक्रमाची सुरुवात दिनांक ०१ नोव्हेंबर२०२५ शनिवार रोजी झाली आहे.

कार्यक्रमाचे आयोजन दर शनिवारी जिल्ह्यातील दत्तक घेतलेल्या गावात राबविण्यात येणार असल्याच्या अनुषंगाने जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर तसेच यावल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू तडवी ,प्राथमिक आरोग्य केंद्र भालोद येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राजक्ता चव्हाण आणि डॉ. भावेश जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपकेंद्र राजोरा अंतर्गत असलेले राजोरा या गावाची निवड अभियानात करण्यात आली.

स्वतःला निरोगी व आरोग्यदायी ठेवण्या साठी हे उपक्रम राबविण्यात येणार असून सदर गावातील ग्रामस्थांना या कार्यक्रमात सहभाग होण्याचे आवाहन करण्यात आले. दिनांक 01 नोव्हेंबर 2025 शनिवार रोजी सकाळी ठीक 10:30 वाजता सायकल रॅली ला सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रमास किशोरवयीन मुला-मुलींनी चांगला प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे राजोरा गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सायकल रॅली चे उद्घाटन राजोरा गावाचे मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमा ला उप सरपंत दिनेश पाटील, ग्राम पंचायत सदस्य चेतन पाटील, मयुर महाजन पोलीस पाटील मुक्ता गोसावी,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्या करिता डॉ. जाकीर हुसेन पिंजारी समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सेविका वैशाली महाजन , आरोग्य सेवक अल्ताफ देशपांडे , आशा सेविका आशा पाटील, मनीषा महाजन मंगला सोनवणे, ज्योती ठाकरे , हेमलता नारखेडे यांचे सहकार्य लाभले

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---