Naxal Movement : सुरक्षा दलाची मोठी कामगिरी; छत्तीसगडमध्ये १४ नक्षलवाद्यांना कंठस्नान

छत्तीसगड पोलीस आणि सीआरपीएफ कडून  कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे.  ओडिशा-छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलींची चकमक झाली.  या चकमकीत १४ नक्षलवादी ठार आहेत. अद्‍याप चकमक सुरु आहे. दरम्‍यान, १ कोटी रुपयांचे बक्षीस असलेला एक नक्षलवादीही या चकमकीत ठार झाल्‍याचे छत्तीसगड पोलिसांनी स्‍पष्‍ट केले आहे.

ओडिशाच्या नुआपाडा जिल्ह्याच्या सीमेपासून फक्त ५ किमी अंतरावर असलेल्या छत्तीसगडच्या कुलारीघाट राखीव जंगलात नक्षलवाद्यांच्या वास्‍तव्‍याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. रविवार, १९ जानेवारीच्या रात्री ही कारवाई सुरू करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. सोमवार, २० जानेवारीला झालेल्या कारवाईत दोन महिला नक्षली चकमकीत ठार झाल्‍या. त्‍यांच्‍याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा आणि आयईडी जप्त करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : पतीला झोपेच्या गोळ्या देऊन ‘ती’ जायची परपुरुषासोबत; मुलीला जाग आली अन् महिलेचं कांड उघड

छत्तीसगडमधील गरियाबंद जिल्ह्यात झालेल्या चकमकीत जवानांनी १४ नक्षलवाद्यांना ठार केले. मोठा शस्‍त्र साठाही जप्‍त करण्‍यात आले आहे. कुल्हाडी घाटावरील भालू डिग्गी जंगलात चकमक सुरुच आहे. सुरक्षा दलांचे सुमारे एक हजार जवानांनी या मोहिमेत सहभागी आहेत. बिजापूर, सुकमा-तेलंगाणा बॉर्डरवर पण नक्षल्यांना टिपण्यात आले आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रासह आंध्रप्रदेशाच्या सीमावर्ती भागत सुद्धा नक्षलवाद्यांची व्यापक शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.

एक कोटी रुपयांचं बक्षीस असलेला चलपती ठार

छत्तीसगड चकमकीत एक कोटी रुपयांचं बक्षीस असलेला जहाल माओवादी चलपती ठार झाला आहे. उडीसा राज्यातील स्टेट कमिटीच्या चीफ म्हणून नक्षलवादी संघटनेमध्ये तो पदावर होता. चलपती हा जवळपास 30 वर्षापासून नक्षल चळवळीत सहभागी होता.

या चकमकीत दोन महिलाही कॅडर नक्षलवादी ठार झाल्या. एक एसएलआर रायफल, अम्बुंश व ईडी स्फोटके घटनास्थळावरून जप्त करण्यात आले आहे. छत्तीसगड पोलीस सीआरपीएफ आणि इंटरेस्टेड पोलीसांच्या मदतीने ऑपरेशन यशस्वी झाले आहे.