---Advertisement---

Kasara Ghat : पोलिसांची मोठी कारवाई ! मुंबई नाशिक महामार्गावरील नाकाबंदी दरम्यान २ कोटी रुपये जप्त

by team
---Advertisement---

मुंबई नाशिक महामार्ग: मुंबई नाशिक महामार्गावर कसारा घाटातील चिंतामण वाडी पोलीस चौकीजवळ स्थानिक पोलीसांनी बुधवारी सकाळच्या सुमारास नाकाबंदी दरम्यान नाशिक हून मुंबई कडे जाणाऱ्या एका वाहनात दोन करोड रुपयांची रोख रक्कम पकडली आहे. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुंबई नाशिक महामार्गावर कसारा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या चिंतामण पोलिस चौकी जवळ स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांकडून वाहनांची तपासणी करत असताना वाहनात रोख रक्कम आढळून आली आहे. अंदाजे दोन कोटी रुपयांच्या आसपास ही रक्कम असल्याचे सांगण्यात येत असून पोलिसांनी ही रोख रक्कम जप्त केली आहे.

कसारा घाटाच्या पायथ्याशी नाशिक मुंबई वाहिनीवर असलेल्या चिंतामणवाडी चौकी येथे पोलिस निरीक्षक सुनील बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली ड्युटीवर असलेले के.बी.झोंबाड यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने हि कारवाई केली आहे. सदर वाहन ताब्यात घेऊन भरारी पथकांकडून पैसे मोजण्याचे काम सुरू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, प्रभारी अधिकारी सुनील बच्छाव व निवडणूक भरारी पथका कडून पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment