मोठी घोषणा! चंद्रयान-3 च्या यशानंतर भारत अंतराळात पाठवणार “महिला रोबोट”

नवी दिल्ली: चंद्रयान-3 च्या यशानंतर भारत गगनयान मोहिमेत महिला रोबोट ‘व्योममित्र’ पाठविणार आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात याची चाचणी घेण्यात जाईल. त्यानंतर महिला रोबोट व्योममित्र अंतराळात पाठवला जाईल, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांनी शनिवारी जी-20 परिषदेत सांगितले. कोरोना महामारीमुळे गगनयान प्रकल्पाला विलंब झाला.

आता आम्ही ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात पहिली चाचणी मोहीम राबवण्याचा विचार करीत आहोत. अंतराळवीरांना परत सुखरूप आणणे हे अंतराळात पाठविण्याइतकेच महत्त्वाचे आहे. दुसर्‍या मोहिमेत एक महिला रोबोट असेल आणि ती सर्व मानवी कि‘यांचे अनुकरण करेल. यात सर्व काही नीट झाले, तर आम्ही पुढे जाऊ, असे त्यांनी सांगितले.

चंद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध‘ुवाजवळ उतरल्याने इस्रोच्या संशोधकांना मोठे यश मिळाले आहे. चंद्रयान-3 चंद्रावर उतरण्याआधी आम्ही खूप घाबरलो होतो. जेव्हा चंद्रयान-3 यान पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या कक्षेत गेले, तेव्हा मोठा आनंद झाला. चंद्रावर चंद्रयान उतरणे हे इस्रोच्या आणि देशाच्या अंतराळ प्रवासातील एक मोठा क्षण आहे. 2019 पर्यंत श्रीहरिकोटाचे दरवाजे माध्यमे आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी बंद होते  परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते खुले करून माध्यमे आणि शालेय मुलांना आमंत्रित केले, असेही सिंह म्हणाले.