COVID-19 : ‘‘राज्यात जेएन. १ कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यापाठोपाठ कोल्हापुरातही एक तरुण कोरोनाबाधित सापडला आहे. त्याला घरात क्वारंटाईन केले आहे. तो कोरोनाबाधित आहे; जेएन. १ ची लागण नाही. लोकांनी घाबरून न जाता मास्कचा वापर करावा,’’ अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांनी दिली.
दरम्यान,सिंधुदुर्गातील 41 वर्षीय पुरुषाला Jn1 ची लागण झाल्याची माहिती काल, गुरुवारी राज्याच्या आरोग्य विभागाने दिलीय.