GST News : जीएसटी कौन्सिलने आता मोठा निर्णय घेतला आहे. शीतपेयासह अनेक वस्तुंचे दर वाढविण्याची शिफारस केली असून शिफारस मंजूर झाल्यास ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. दरम्यान, तत्पूर्वी यासंदर्भातील प्रस्ताव GST परिषदेकडे पाठविण्यात येणार आहे.
जीएसटी दर तर्कसंगत करण्यासाठी GOM ची स्थापना करण्यात आली आहे. शीतपेये, सिगारेट आणि तंबाखू यांसारख्या हानिकारक उत्पादनांवरील कर दर सध्याच्या 28 टक्क्यांवरून 35 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस करण्यात आली आहे. याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे. जीओएमने कपड्यांवरील कर दर तर्कसंगत करण्याचा निर्णय घेतला. जीओएम बैठकीत घेतलेल्या निर्णयांवर जीएसटी परिषद अंतिम निर्णय घेणार आहे. GOM एकूण 148 वस्तूंवरील कर दरांमध्ये बदल GST परिषदेकडे प्रस्तावित कारणात आहे.
21 डिसेंबर रोजी होणार बैठक
21 डिसेंबर रोजी होणाऱ्या GST कौन्सिलच्या बैठकीत मंत्री गटाच्या अहवालावर चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या परिषदेचे अध्यक्ष केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन असतील आणि राज्यांचे अर्थमंत्रीही यात सहभागी होतील. जीएसटी दरातील बदलाचा अंतिम निर्णय फक्त जीएसटी परिषद घेईल. सध्या, जीएसटी ही चार-स्तरीय कर रचना आहे ज्यामध्ये पाच, १२, १८ आणि २८ टक्के स्लॅब आहेत.
विशेष कर लागू होणार का?
एका अधिकाऱ्याने सांगितले की, या पाऊलामुळे निव्वळ महसुलात वाढ होईल. अधिकाऱ्याने सांगितले की, GoM ने तंबाखू आणि त्याची उत्पादने आणि शीतपेयांवर 35 टक्के विशेष दर लावण्याचे मान्य केले आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, 5, 12, 18 आणि 28 टक्क्यांचा चार-स्तरीय कर स्लॅब कायम राहील आणि GoM द्वारे 35 टक्क्यांचा नवा दर प्रस्तावित केला आहे. यासोबतच, जीओएमने म्हटले आहे की, 1,500 रुपयांपर्यंतच्या रेडिमेड कपड्यांवर पाच टक्के कर आकारला जाईल, तर 1,500 ते 10,000 रुपयांपर्यंतच्या कपड्यांवर 18 टक्के आणि 10,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कपड्यांवर कर आकारला जाईल.